शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बसच्या बोनेटवर व्यक्तीला लटकवत चालक सुसाट; राजधानी दिल्लीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 11:55 IST

राजधानी दिल्लीत घडलेल्या या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Delhi Viral Video :दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील भर रस्त्यात मिनी बस चालकाने व्यक्तीला धडक दिल्याची घटना समोर आली. या व्यक्तीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या बसचालकाने केलेले कृत्य पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाचा पारा चढला आहे. 

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटल्याचे चित्र आहे. दिल्लीतील कोटला मुबरकपूर भागात हा संतापजनक प्रकार घडला. रात्रीच्या वेळेस रस्त्यानजीक उभ्या असलेल्या एका व्यक्तीला बसवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 

सदर घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, रात्रीच्या सुमारास दिल्लीच्या रस्त्यावर एक व्यक्ती आणि मिनी बस चालक यांच्यामधील वादाने भयानक स्वरुप घेतले. दक्षिण दिल्लीच्या कोटला मुबारपकपूर भागातून ही मिनी बस मार्गस्थ होत होती. भरधाव वेगात असलेल्या मिनी बस चालकाने गाडी ओव्हरटेक केली. रस्त्यानजीक उभ्या असलेल्या व्यक्तीला या  बसचालकाने धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राग अनावर झाल्याने या व्यक्तीने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मिनी बसचालकाने या व्यक्तीला काही जुमानले नाही. गाडी थांबवण्याच्या प्रयत्नात हा तरूण मिनी बसच्या  बोनेटवर चढला. तेव्हा बसचालकाने आपली गाडी नोएडा शहाराच्या दिशेने वळवली. त्यावेळी बोनेटवर चढलेला व्यक्ती गाडी थांबवण्याची विनंती करत होता. मात्र, मिनी बसचालकाने गाडी थांबवली नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

१७ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पण्ण झाले आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शिवाय अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काहींनी केली आहे.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :delhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर