कर्माने मेला! बायकोला म्हणाला, तुझ्यापेक्षा ती कियारा अडवाणी छान आहे,...Video पहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 17:20 IST2023-02-06T17:20:29+5:302023-02-06T17:20:47+5:30
Husband Wife on Kiara Advani Marriage: पती-पत्नीमधील लाखो किस्से आज इन्स्टाग्रामवर आहेत. परंतू हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की असे आपल्यासोबतही घडलेय.

कर्माने मेला! बायकोला म्हणाला, तुझ्यापेक्षा ती कियारा अडवाणी छान आहे,...Video पहा...
पती-पत्नीवरील जोक्स तर कमालीचे असतात. कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. पण आजचा हा प्रसंग तुमच्याही आयुष्यात आलाच असेल. असाच एक किस्सा इन्स्टाग्रामवरील पतीराजांसोबत घडला आहे. चुकून त्याच्या तोंडून कियारा अडवाणी तुझ्यापेक्षा चांगली आहे, असे वाक्य बाहेर पडले... पण त्याला क्षणातच समजले त्याचे काय चुकले....
पती-पत्नीमधील लाखो किस्से आज इन्स्टाग्रामवर आहेत. परंतू हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की असे आपल्यासोबतही घडलेय. बायकोला कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे सांगता येत नाही. परंतू या गोष्टीचा नेहमीच राग येतो. ती म्हणजे दुसऱ्यांबरोबर तिची केलेली तुलना... हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्यावरील प्रसंग आठवला असेल...
हा व्हिडीओ ५१ सेकंदांचा आहे. यात स्वयंपाक करताना एक महिला दिसत आहे. तर तिचा पती तिला काहीतरी विचारत आहे, समजावत आहे. अरे यार, ती अभिनेत्री आहे! तुला का राग येतोय? तू असं म्हणत आहेस म्हणजे मी तिच्याशी लग्न करेन? असे नवरा यात म्हणत आहे. यावर त्याची ती बायको त्याच्याकडे न बघताच, जा कर असे सांगत आहे. जणू ती माझ्याशीच करेल, असे नवऱ्याने म्हणताच... त्यांच्यात खरे काय घडलेय ते समजायला लागते. नाही, नाही... करणार, तू खूप चांगला आहेस ना, सगळ्या मुली तुझ्या प्रेमात पडतील, असे ती म्हणते. यावर नवर आपली बाजू मांडायचा प्रयत्न करतो.
When husband compares his wife with @advani_kiara! 😂#KiaraAdvani#viral#cutecouplepic.twitter.com/JV99Tw6pPg
— Praveen 🇮🇳 (@PraveenSarraf_) February 1, 2023
मला कुठली अभिनेत्री आवडू शकत नाही का? असे तिला विचारतो. यावर तू तिच्याशी मला कंपेअर का केले, असे संतापून विचारत तू कियारा अडवाणीकडे जा, तुला जेवण मिळणार नाही!, असे सांगत असताना जी काही रागात पाहते ते पाहून त्या नवरदेवाला त्या दिवशी तरी काही जेवन मिळाले नसणार हे दिसते.