स्विगी इन्स्टामार्टकडे अनेक ग्राहक अजब अजब डिमांड करत असतात. ज्यांची स्क्रीनशॉट नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका ग्राहकाच्या डिमांडवर स्विगी इन्स्टामार्टनं एक्सवर दिलेलं उत्तर सध्या व्हायरल झालं आहे. एका एक्स यूजरनं स्विगीकडे एक गर्लफ्रेन्ड डिलिव्हरी करण्याची डिमांड केली. त्यावर जे उत्तर मिळालं ते वाचून लोक पोटधरून हसत आहेत. स्विगी इन्स्टामार्ट ग्राहकाच्या इच्छेनुसार काहीही देण्याचं आश्वासन देतात. तशी त्यांची जाहिरातही होती. पण वेगानं वाढत असलेल्या या कंपनीच्याही काही मर्यादा आहेत.
अशात एका ग्राहकानं स्विगीला एक्सवर विचारलं की, काय ते त्याच्यासाठी एक गर्लफ्रेन्ड त्याच्या पत्त्यावर पाठवू शकतात? कंपनीला त्याला नकार द्यावा लागला. आता सोशल मीडिया यूजर्सच एकमेकांसोबत यावरून वाद घालत आहेत.
हे सगळं ३१ डिसेंबरला सुरू झालं. स्विगी इन्स्टामार्ट नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला ऑर्डरबाबत लाइव्ह-ट्विट करत होते. सायंकाळी साधारम ५ वाजून ३० मिनिटांनी स्विगी इन्स्टामार्टनं खुलासा केला की, ४,७७९ पॅकेट कंडोमची ऑर्डर देण्यात आली होती आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यातही आलेत. याच ट्विटवर प्रतिक्रिया देत एका यूजरनं लिहिलं की, 'माझ्या पिनकोडवर एक गर्लफ्रेन्ड डिलिव्हर करा'.
ग्राहकाच्या गर्लफ्रेन्डच्या डिमांडकडे स्विगी इन्स्टामार्टचं लक्ष गेलं. अशात त्यांनी ग्राहकाच्या डिमांडवर मजेदार उत्तर दिलं. 'इथे हे सगळं मिळत नाही. पण आता लेट नाइट फी हटवली आहे, एक लॉलीपॉप ऑर्डर कर'. स्विगीच्या अधिकृत एक्स अकाऊंट इन्स्टामार्टनं उत्तर दिलं. त्यासोबतच राग आलेल्या चेहऱ्याचा इमोजी सुद्धा पोस्ट केला.
दरम्यान, चिप्स, कोल्ड ड्रिंक, कंडोम, दूध आणि आइस क्यूबला ग्राहकांनी सगळ्यात जास्त पसंती दिली. भारतीय लोकांनी नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला सगळ्यात जास्त या गोष्टी ऑर्डर केल्यात.