Viral Video : तसं तर सिंहाचा जंगलाचा राजा म्हटलं जातं. पण हत्तीच्या ताकदीपुढे भले भले प्राणी फेल होतात. अनेकदा हत्ती मोठमोठ्या प्राण्यांना धूळ चारताना दिसतात. याचंच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नदी किनारी पाणी पित असलेल्या एका हत्तीवर मगरीनं हल्ला केला. पण त्यानंतर जे झालं ते बघून त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. हत्ती आणि मगरीची ही लढाई अंगावर काटा आणणारी आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, दोन ते तीन हत्ती नदी किनारी पाणी पित आहेत. तेव्हा अचानक एक मगर समोर येते आणि पाणी पित असलेल्या हत्तीची सोंड तोंडात पकडते. हत्ती संतापतो आणि मगरीला सोंडेनं जोरात धक्का देतो. मगरीला चांगलाच मार लागतो आणि ती शांत होते. त्यानंतर हत्ती मगरीला पुन्हा धडा शिकवतो.
हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि २३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'जंगलाचा खरा राजा'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'हत्तीची शक्ती तर बघा'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'कर्माचं फळ लगेच मिळालं'.