शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: तमाशा पाहत राहिली लोक पण गायीने वाचवले कुत्र्याला, व्हिडिओ पाहुन व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:50 IST

कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? माणसांपेक्षाही खरी माणूसकी ही प्राण्यांमध्ये असते. एखादी दुर्घटना घडताना माणसं एखादवेळेस बघत राहतील. मोबाईलने ...

कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? माणसांपेक्षाही खरी माणूसकी ही प्राण्यांमध्ये असते. एखादी दुर्घटना घडताना माणसं एखादवेळेस बघत राहतील. मोबाईलने व्हिडिओ काढण्यात गुंग असतील पण प्राणी त्या संकटकाळात अडकलेल्या मदत करण्यातच धन्यता मानतात. तुम्हाला खरं वाटत नसेल तर हा खालील व्हिडिओ हे सिद्ध करेल.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती कुत्र्याचे कान खेचतोय. कुत्रा वेदनेने किंचाळत असतो, ओरडत असतो. पण या व्यक्तीला अजिबात दया आली नाही. ही व्यक्तीच कशाला तिच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत पण कुणालाही या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून पाझऱ फुटला नाही.  कुणीही त्या कुत्र्याच्या मदतीला आलं नाही. या क्रूर व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली नाही. माणसं दगड झाली पण मुके जीव नाही. या कुत्र्याचा आवाज एका गाईच्या कानावर पडला आणि ती त्याच्या मदतीसाठी धावून आली. गायीने या कुत्र्याला क्रूर माणसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपड केली.

गाय तशी शांत, सहसा ती कुणावर हल्ला करत नाही. पण कुत्र्याचा असा छळ करणाऱ्या माणसांना पाहून मात्र ती इतकी भडकली अगदी बैलासारखी ती त्याच्यावर तुटून पडली. त्या व्यक्तीला आपल्या शिंगांनी उडवून जमिनीवर आपटलं. कुत्रा त्या माणसाच्या तावडीतून सुटला आणि संधी मिळताच त्याने तिथून पळ काढला.

हा व्हिडीओ तसा जुना आहे पण सुशांत नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. जे काम एक माणूस करू शकला नाही ते गोमाताने केलं, कोणतीही आई असो ती कुणाच्याच वेदना सहन करू शकत नाही, अशा प्रतिक्रिया युझर्सनी दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdogकुत्राcowगाय