Cow on roof viral video : कुत्र्यांच्या भीतीने तुम्ही कधी गाय घराच्या छतावर चढताना पाहिली आहे का? नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहायला हवा. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बोराज मंडलच्या निराला गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात एक गाय आपला जीव वाचवण्यासाठी चक्क घराच्या छतावर चढून बसल्याचे दिसून येत आहे.
असे सांगितले जात आहे की भटक्या कुत्र्यांच्या एका कळपाने या गायीचा पाठलाग केला. भीतीमुळे गाय पळत राहिली आणि कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी ती थेट एका घराच्या छतावर चढली. घराच्या छतावर गाय पाहून गावकरी थक्क झाले. गायीच्या वजनामुळे छत कोसळू शकते अशी भीती त्यांना वाटत होती. या व्हायरल व्हिडिओमध्ये गावकरी गायीला खाली उतरवण्यासाठी धडपडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र गाय इतक्या उंचीवर कशी पोहोचली हे अजूनही एक गूढच आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ-
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. बहुतांश लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.