Couple romance on bike Video Viral: हल्लीचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल याची काहीच कल्पना नसते. त्यातच हल्ली सामाजिक स्तरावरील जीवनही फार विचित्र झाले आहे. त्यामुळेच अनेकदा रस्त्यावर काहीतरी अनोखे किंवा चुकीचे घडताना दिसले की लोक ती घटना कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. मग तो व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि व्हायरल होतो. यातील काही व्हिडिओंचे कौतुक होते तर काहींवर टीका होते. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक संतापले आहेत.
काय आहे तो व्हिडीओ?
हा व्हिडिओ चालत्या कारमधून रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, बाईकवर बसलेला एक तरुण आणि एक तरुणी धोकादायक स्टंट करत आहेत. व्हिडिओमध्ये मुलगा बाईक चालवताना दिसतो, तर मुलगी अश्लील पद्धतीने त्या मुलाच्या पुढील बाजुस उलटी बसून मुलाला मिठी मारते. दोघेही रस्त्यावर निर्लज्जपणे अश्लील चाळे करताना दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सचा संताप
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सुमारे ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर व्यक्त होत आहेत. एकाने लिहिलेय की, अशा लोकांना चपलेने झोडून काढले पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, यांचे लायसन्स रद्द करून टाकायला हवे. तिसऱ्याने तर प्रश्न उपस्थित केलाय की, असे अश्लील चाळे भररस्त्यात दाखवून हे लोक नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? आणखीही अनेक युजर्स यावर आक्रमकपणे व्यक्त झाले आहेत.