चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:47 IST2025-10-07T11:47:08+5:302025-10-07T11:47:56+5:30
पंजाबच्या लुधियानामध्ये चालत्या कारच्या सनरूफवर एका जोडप्याने किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या परदेशी जोडप्याच्या कृत्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण बातमी वाचा.

चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
लुधियाना: पंजाबमधील लुधियाना येथे एका जोडप्याने चालत्या कारच्या सनरूफमधून बाहेर येऊन एकमेकांचे चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, या जोडप्याच्या अशा वागण्यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी लुधियानातील एका हॉटेलजवळ घडली. व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी चालत्या कारच्या सनरूफमधून बाहेर आलेले दिसत आहेत. रहदारीच्या रस्त्यावर ते एकमेकांना किस करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या जोडप्यावर टीकेची झोड उठली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. हे जोडपे युगांडाचे नागरिक असून, ते शिक्षणासाठी पंजाबमध्ये आले आहेत. ते लुधियानातील बीआरएस नगरजवळील लालबाग परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत असल्याची माहिती मिळाली आहे.