शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोनाराच्या दुकानात चोरी करायला गेले अन् दुकानदाराच्याच जाळ्यात अडकले, कुत्र्याने घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 11:32 IST

एक कपल अगदी श्रीमंत असल्याच्या थाटात तयार होऊन सोनाराच्या दुकानात जातं. मात्र ते दोघे असतात चोर. ते चोरी करायला जातातही पण दुकानाच्या मालकाच्या युक्तीसमोर त्यांचा प्लॅन फोल ठरतो...

चोरीच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा या घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाल्यानं व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं, की एक कपल अगदी श्रीमंत असल्याच्या थाटात तयार होऊन सोनाराच्या दुकानात जातं. मात्र ते दोघे असतात चोर. ते चोरी करायला जातातही पण दुकानाच्या मालकाच्या युक्तीसमोर त्यांचा प्लॅन फोल ठरतो...

व्हिडिओमध्ये दिसतं, की हे कपल सोनाराच्या दुकानात जातं. यातील पुरुष सूटाबूटात दिसला तर महिलेनं गाउन घातलेला होता. आपल्या आउटफिटला सूट होणारा मेकअप तिनं केला होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता, की सोनारच्या दुकानात जात हे दोघंही वेगवेगळे दागिने बघतात. दोघंही दुकानात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या हातात एक रिकामा गिफ्टचा बॉक्स असतो. काही वेळात पुरुष दुकानदाराला बोलण्यात गुंतवतो आणि महिला रिकामा बॉक्स उचलून बाजूला ठेवते.

काही वेळानंतर दोघंही असं नाटक करतात की दुकानात त्यांना काहीच आवडलं नाही. त्यामुळे आता ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतात. जेव्हा ते बाहेर पडू लागतात तेव्हा महिला गिफ्ट बॉक्ससोबत सोन्याचा हारही उचलते आणि पुढे जाते. मात्र, यादरम्यान एक मजेशीर घटना घडते. ही महिला जेव्हा बॉक्सहीत हार उचलते तेव्हा ती याकडे लक्ष देत नाही की या हारासोबत एक दोरी बांधललेली आहे. यामुळे महिला पुढे निघताच दुकानदाराला समजतं, की हे दोघंही चोरी करण्यासाठी आले आहेत.

शेवटी महिला तिच्यासोबत असलेल्या पुरुषाच्या हातात हा बॉक्स देते आणि तिथून पळ काढते. यानंतर दुकानात असलेला कुत्रा या व्यक्तीवर हल्ला करतो. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. अनेकांनी दुकानदारानं लढवलेली शक्कल पाहून त्याचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाGoldसोनंtheftचोरीcctvसीसीटीव्ही