Coronavirus : बापरे! चक्क ATM मधून चोरलं सॅनिटायझर, चोरट्याचा व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:08 IST2020-03-31T14:47:40+5:302020-03-31T15:08:39+5:30
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वतः स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे.

Coronavirus : बापरे! चक्क ATM मधून चोरलं सॅनिटायझर, चोरट्याचा व्हिडीओ व्हायरल...
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. विविध ठिकाणी हात धुण्याचे आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचे महत्व पटवून दिलं जातं आहे. कारण कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वतःची स्वच्छता महत्वाची आहे. अशा परिस्थितीत एकाने चक्क सॅनिटायजरची चोरी केली आहे.
ही घटना पाकिस्तानातील आहे. सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे लोकांना चक्क चोरी करावी लागत आहे. कोरोनाव्हायरसमुळे, हात सॅनिटायझरचा चांगला खप होतो आहे. मात्र यामुळे सॅनिटायझरची कमतरताही जाणवत आहे. यामुळेच पाकमध्ये एका चोराने चक्क एटीएममध्ये ठेवलेले सॅनिटायझर चोरले.
When you think no one is watching you.. pic.twitter.com/2V08SHHdwg
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) March 29, 2020
हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती एटीएममधून हँड सॅनिटायझर चोरत आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, "जेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीही आपल्याकडे पाहात नाही". पाकमध्ये कोरोनामुळे किती वाईट अवस्था झाली आहे. हे त्याचं उदाहरण आहे.