CoronaVirus : Grandfather met his grandson through a window due to corona virus myb | CoronaVirus : कोरोनामुळे आजोबा आणि नातवंडाची ताटातूट, फोटो पाहून व्हाल भावूक

CoronaVirus : कोरोनामुळे आजोबा आणि नातवंडाची ताटातूट, फोटो पाहून व्हाल भावूक

चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने पाहता पाहता संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे झाला आहे. या परिस्थितीत अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत.  या पार्श्वभूमीवर अनेक लोकांची गैरसोय झालेली दिसून येत आहे. अनेक लोक आपल्या  घरापासून लांब आहे. सगळी वाहतुकीची साधनं बंद असल्यामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. असाच एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक आजोबा आपल्या नुकत्याच जन्म झालेल्या नातवाला खिडकीतून पाहत आहेत.  यात असं दिसून येत आहे की त्यांना आपल्या नातवाला  हातात घ्यायचं आहे. पण कोरोना व्हायरसच्या इफेक्टमुळे ते फक्त आपल्या नातवाला पाहू शकतात.  कोरोना व्हायरस निघून जाण्याच्या प्रयत्नात ते आहेत. ( हे पण वाचा-एक असं ठिकाण जिथे 100 वर्षांपूर्वी आनंदाने राहत होते लोक, आता प्राण्यांना जाण्यासही आहे बंदी!)

हा फोटो आयलँडचे निवासी एमा यांनी आपला भाऊ मिशेल याला शेअर केली आहे. या फोटोमध्ये मिशेल आपल्या नवजात बाळाला खिडकीतून  आपल्या वडिलांना दाखवत आहे. ६० पेक्षा जास्त वय  असलेल्या लोकांना  कोरोना व्हायरस पसण्याचा धोका जास्त असतो. सोशल मीडियावर लोक हा फोटो पाहून खूप भावनीक होत आहेत. (हे पण वाचा-म्हणून 'या' कंपनीत स्टाफ कमवतो ५० लाख, पण मालकंच घेतो कमी पगार....)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : Grandfather met his grandson through a window due to corona virus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.