Corona Virus : कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर किती वेळा धुतात हात? व्हिडीओ पाहून उघडेल तुमचेही डोळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 03:57 PM2020-03-17T15:57:20+5:302020-03-17T16:05:55+5:30

अमेरिका, चीन, इराण, इटली आणि भारत सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे. अशात जगभरात मेडिकल वर्कर्स तासंतास अनेक दिवस लागोपाठ काम करत आहेत.

Corona Virus : Know how many times doctors wash their hands after treat Coronavirus patient api | Corona Virus : कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर किती वेळा धुतात हात? व्हिडीओ पाहून उघडेल तुमचेही डोळे...

Corona Virus : कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर किती वेळा धुतात हात? व्हिडीओ पाहून उघडेल तुमचेही डोळे...

Next

कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने अनेक देशांच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रभाव पडत आहे. आतापर्यंत जगभरात ७ हजारांपेक्षा बळी कोरोनाने घेतले आहेत. तर १ लाख ८३ हजार लोक या व्हायरसने संक्रमित झाले आहेत. अमेरिका, चीन, इराण, इटली आणि भारत सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे. अशात जगभरात मेडिकल वर्कर्स तासंतास अनेक दिवस लागोपाठ काम करत आहेत. लोकांना सांगितलं जात आहे की, सतत हात धुवावे. अशात एक व्हिडीओ समोर आला असून यात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांवर उपचार करणारी डॉक्टर हात धुताना दिसत आहे.

हा व्हिडीओ CGTN च्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आलाय. त्यात कॅप्शन लिहिले आहे की, 'ड्युटीहून घरी जाण्यापूर्वी डॉक्टर किती वेळा हात धुतात हे तुम्हाला माहीत आहे का?'.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या महिला डॉक्टरने अनेक प्रकारचे मास्क घातले आहेत. ती जेव्हा जेव्हा मास्क काढते, तेव्हा तेव्हा ती हात सॅनिटाइज करते. यात व्हिडीओत ती ११ वेळा हात धुताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून लोकांनी डॉक्टरांच्या मेहनतीला सलाम केला आहे. त्यांचं कौतुक केलं जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या हेही अधिक लक्षात आलं असेल की, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात धुणे किती गरजेचे आहे. 


Web Title: Corona Virus : Know how many times doctors wash their hands after treat Coronavirus patient api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.