Corona virus : कोरोनाला हरवण्यासाठी हात धुवायची पद्धत शिकवतोय 'हा' प्राणी, पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 14:36 IST2020-04-12T14:25:28+5:302020-04-12T14:36:43+5:30
हात स्वच्छ धुण्याबाबत वेगवेगळ्या स्तरातून आवाहन केलं जात आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

Corona virus : कोरोनाला हरवण्यासाठी हात धुवायची पद्धत शिकवतोय 'हा' प्राणी, पहा व्हिडीओ
कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतात झपाट्याने पसरत आहे. त्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण वैयक्तीक पातळीवर सुद्धा स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. कोरोनाला हरवण्यासाठी स्वतःचे हात नेहमी स्वच्छ धुणं गरजेचं आहे. हात स्वच्छ धुतले जाण्यासाठी २० ते २५ सेकंद धुवायला हवेत. हात स्वच्छ धुण्याबाबत वेगवेगळ्या स्तरातून आवाहन केलं जात आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
या व्हिडीओत रेकॉन नावाच्या प्राण्यानं हात कसे धुवायचे हे सांगितलं आहे. हात तर सगळेच धुवतात पण ते धुवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीनं हात धुतले तर आपण निरोगी राहू. हा प्राणी कसा हात धुवत हे तुम्ही पाहू शकता. चांगले आणि स्वच्छ हात कसे धुवायचे याची कृती करून दाखवत आहे.
Everybody must wash their hands carefully. Second Demo by the Raccoon🦝 . Watch carefully. TikTok video. pic.twitter.com/JJpzfU7YDB
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 10, 2020
रेकॉन नावाच्या या प्राण्याचा गमतीदार टीकटॉक व्हिडीओ IFS ऑफिसर प्रवीण कासवान यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओला ५०४ रिट्वीट ४५ कमेंट्स आल्या आहेत.