बंदा ये जास्तच बिनधास्त आहे! याची उडी पाहुन तुमच्या अंगावर येतील शहारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:18 IST2021-07-16T17:16:59+5:302021-07-16T17:18:02+5:30

काही जण इतकी साहसी असतात की साहसासाठी ते आपला जीवही धोक्यात घालतील. अशा साहसवीरांना सलाम करावाच पण त्यांच्यासारखी साहस जरा सांभाळूनच करावी.

Come on guys, it's too much! you will be frightened when you see this jump | बंदा ये जास्तच बिनधास्त आहे! याची उडी पाहुन तुमच्या अंगावर येतील शहारे

बंदा ये जास्तच बिनधास्त आहे! याची उडी पाहुन तुमच्या अंगावर येतील शहारे

खतरों के खिलाडी पाहताना तुमच्या अंगावर जर शहारे येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पाहुच नका. काही जण इतकी साहसी असतात की साहसासाठी ते आपला जीवही धोक्यात घालतील. अशा साहसवीरांना सलाम करावाच पण त्यांच्यासारखी साहस जरा सांभाळूनच करावी.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक साहसी तरुण स्केटबोर्डच्या साहाय्याने इतक्या उंचीवरून उडी मारतो की तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. या व्हिडिओत तो एका जमीनीपासून बऱ्याच उंचीवर असणाऱ्या ब्रीजवर उभा आहे. त्याचा एक पाय स्केटबोर्डवर आहे तर दुसरा पाय हवेत. काही क्षणातच तो खाली उडी मारतो. ते पाहताच तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. हा तरुण वाचणार असा विश्वासच तुम्हाला वाटणार नाही. पण हा तरुण पॅराशुट वेळीच उघडतो आणि पॅराशुटच्या साह्याने हळूहळू जमिनीवर सुखरुप पोहचतो.

हा व्हिडिओ अ‍ॅक्वालेडी या युजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटलंय अशी कोणती गोष्ट आहे जी अशा प्रकारची मजा करण्यापासून तुम्हाला थांबवतेय? पण या प्रश्नाच्या गोत्यात तुम्ही अजिबात येऊ नका कारण सावध तो सुखी!

Web Title: Come on guys, it's too much! you will be frightened when you see this jump