Video - हृदयस्पर्शी! 8 वर्षांच्या मुलाला शाळेत पोहोचताच मिळालं वाढदिवसाचं जबरदस्त सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 15:03 IST2023-11-05T14:53:43+5:302023-11-05T15:03:26+5:30

एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका लहान मुलासाठी वाढदिवस साजरा होणं किती महत्त्वाचं आहे हे कळेल.

columbia classmates make 8 year old cry on birthday surprise is heartwarming | Video - हृदयस्पर्शी! 8 वर्षांच्या मुलाला शाळेत पोहोचताच मिळालं वाढदिवसाचं जबरदस्त सरप्राईज

Video - हृदयस्पर्शी! 8 वर्षांच्या मुलाला शाळेत पोहोचताच मिळालं वाढदिवसाचं जबरदस्त सरप्राईज

आपण सर्वजण आपला वाढदिवस साजरा करतो. काही लोक कुटुंबीयांसोबत तर काही मित्रमैत्रिणींसोबत थाटामाटात साजरे करतात. पण प्रत्येकजण भाग्यवान नसतो. जगात अशी काही माणसं आहेत ज्यांच्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा करणं हे एखाद्या स्वप्नासारखं असतं. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका लहान मुलासाठी वाढदिवस साजरा होणं किती महत्त्वाचं आहे हे कळेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. 

कोलंबियामधील एबेजिको येथील हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये 8 वर्षांचा मुलगा एंजल डेविड त्याच्या शाळेत पोहोचला. वर्गाबाहेर आल्यानंतर त्याला वर्गमित्रांकडून वाढदिवसाचं सरप्राईज मिळालं. वर्ग छान सजवला होता आणि प्रत्येकजण वाढदिवसाचे गाणं गात होतं. 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच वाढदिवस साजरा होत असलेला पाहून मुलाला सुखद धक्का बसतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मुलं नंतर त्याला येऊन मिठी मारतात आणि शुभेच्छा देतात. 

'आई कधीच वाढदिवस साजरा करू शकली नाही'

डेविडचे शिक्षक कॅसस झिमेनो यांनी माहीत होतं की, पैशांच्या कमतरतेमुळे त्याच्या आईने कधीही त्याचा वाढदिवस साजरा केला नाही. अशा स्थितीत त्यांनी इतर शिक्षकांसमवेत ठरवलं की, यावेळी नक्कीच ते त्याचा वाढदिवस साजरा करतील. या सरप्राईजमध्ये शिक्षकांनी एंजिलच्या मित्रांनाही सहभागी केलं. या मुलांनी मित्रासाठी वर्ग सजवला होता. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. प्रत्येकाला असे मित्र असावेत, अशा शिक्षकाला सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार द्यायला हवा असं लोकांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ 25 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून 10 लाख लोकांनी त्याला लाईक केला आहे.
 

Web Title: columbia classmates make 8 year old cry on birthday surprise is heartwarming