शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरारा खतरनाक! ना पैसे, ना कोणता माल; तब्बल १७ लाखांची चॉकलेट्स घेऊन चोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 15:52 IST

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ मधून एक अनोखी घटना समोर आली आहे.

लखनौ : उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ (Lucknow) मधून एक अनोखी घटना समोर आली आहे. लखनौ मधील चिन्हाट (Chinhat) येथील देवराजी विहार परिसरात ही घटना घडली आहे. इथे चोराने पैसे किंवा इतर कोणत्या वस्तूंची चोरी केली नसून चक्क लाखो रूपयांची चॉकलेट्स लंपास केली आहेत. चोरी झालेल्या चॉकलेट्सची किंमत तब्बल १७ लाख रूपये असल्याचे बोलले जात आहे. चोरट्यांनी घर फोडून गोडाऊनमध्ये ठेवलेले सुमारे १७ लाख रुपये किंमतीचे चॉकलेट्स चोरून नेल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लखनौ मधील कॅडबरी गोडाऊनमधून (Cadbury godown) १७ लाख रूपयांच्या चॉकलेट्सची चोरी झाली आहे. कॅडबरी वितरक करणाऱ्या राजेंद्र सिंग यांनी सांगितले, आम्ही चिन्हाट पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तसेच कोणाला घटनेची अधिक माहिती मिळाल्यास कळवावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

लाखो रूपयांच्या चॉकलेटची चोरीव्यावसायिक राजेंद्र सिंग आपल्या पत्नीसोबत लखनौमधील ओमेक्स या भागात राहतात. याआधी चिन्हाटमध्ये राहत होते मात्र त्यांनी चिन्हाटच्या घराचे रूपांतर गोडाऊनमध्ये केल्यानंतर ते ओमेक्स येथे राहण्यासाठी आले. या सर्व घटनेची माहिती शेजाऱ्यांनी दिल्याचे ते सांगत आहेत. चोरीची माहिती मिळताच त्यांनी चिन्हाट येथील गोडाऊनकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत चॉकलेट्स गायब झाले होते. राजेंद्र सिंग घरात नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराबाहेर लोडर लावले आणि त्यात लाखो रुपये किमतीची चॉकलेट्स भरून पळ काढला. याशिवाय त्यांची ओळख पटू नये म्हणून गोदामात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR) देखील आपल्या सोबत नेला. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीlucknow-pcलखनऊ