शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Live दरम्यान चाहत्यांनी उकसवलं; सोशल मीडिया स्टारनं किटकनाशक प्यायलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:45 AM

कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. मी खूप मानसिक तणावाखाली जगत आहे असं तिने लाईव्हवेळी म्हटलं होतं.

सोशल मीडियाने अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. अनेकदा मनातलं सांगण्यासाठी काहीजण सोशल मीडियाचा वापर करत असतात. सोशल मीडियावर आपली व्यथा मांडून लाईव्ह आत्महत्या केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मानसिक दडपणाखाली काहीजण टोकाचं पाऊल घेत असतात. अशावेळी लाईव्ह स्ट्रिमिंग करून इतरांच्या उपस्थितीत जीव घेतल्याचं ऐकलं असेल. चीनमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

चीनची सोशल मीडियातील प्रसिद्ध चेहरा लुओ शाओ माओ जी(Luo Xiao Mao Zi) हिनं किटकनाशक औषध प्यायल्याने तिचा मृत्यू झाला आहे. माओ जीने लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी पेस्टिसाइड प्यायलं  होतं. लाईव्हवेळी त्यांच्या फोलोअर्सने माओ जी हिला पेस्टिसाइड पिण्यासाठी उकसवलं होतं. त्यानंतप माओ जीनं हे पेस्टिसाइड प्यायलं त्यानंतर जे घडलं त्यांना खळबळ माजली.

पेस्टिसाइड प्यायल्यानंतर २५ वर्षीय माओ हिची तब्येत ढासळली. तिने स्वत: रुग्णवाहिकेला फोन करून घरी बोलावलं. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Douyin वर माओने तिच्या अखेरच्या व्हिडीओत सांगितलं होतं की, कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. मी खूप मानसिक तणावाखाली जगत आहे. तेव्हा Douyin वर माओचे ६ लाख ७० हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स होते.

माओ तिच्या अखेरच्या व्हिडीओत पेस्टिसाइड पिताना दिसत आहे. ती म्हणाली की, मी कुठल्याही उत्पादनाला विकण्यासाठी हा व्हिडीओ बनवत नाही. त्यानंतर लाईव्ह स्ट्रिमिंगवेळी तिने पेस्टिसाइड प्यायलं. डेली स्टारच्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबरला ही दुर्घटना माओसोबत घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. माओच्या एका मित्राने सांगितले की, ती गेल्या काही दिवसापासून बॉयफ्रेंडसोबत झालेल्या भांडणामुळे चिंतेत होती. तिचा हेतू पेस्टिसाइड पिऊन जीव देण्याचा नव्हता. ती केवळ बॉयफ्रेंडचं लक्ष वेधू इच्छित होती.

जेव्हा माओनं पेस्टिसाइड प्यायलं होतं तेव्हा हजारो लोक तिला लाईव्ह पाहत होते. चीनी मीडियानुसार, लाईव्हच्या दरम्यान अनेक फॉलोअर्सने माओला पेस्टिसाइड लवकरच पिण्यासाठी उकसवलं होतं. त्यानंतर ही दुर्घटना घडली. ज्यात माओचा मृत्यू झाला.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया