चिमुकल्याची फ्लाईंग किक होतेय हिट, नेटकरी बोल्ले हा तर खिलाडीयोंका खिलाडी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 19:35 IST2021-07-09T19:25:23+5:302021-07-09T19:35:38+5:30
एक चिमुकला सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. त्याचा व्हिडिओ बघुन नेटकरी म्हणत आहेत हा तर अक्षय कुमारचा स्पर्धक आहे. असं काय केलंय या चिमुकल्याने? पाहा पुढे...

चिमुकल्याची फ्लाईंग किक होतेय हिट, नेटकरी बोल्ले हा तर खिलाडीयोंका खिलाडी...
असं म्हणतात मुलं म्हणजे देवाघरची फुलं पण मुलं जेव्हा मस्ती करतात तेव्हा आईवडिलांच्या नाकी नऊ येतात. मात्र का्ही मुलांची मस्तीच त्यांना कौतुकाचं धनी बनवते. असाच एक चिमुकला सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. त्याचा व्हिडिओ बघुन नेटकरी म्हणत आहेत हा तर अक्षय कुमारचा स्पर्धक आहे. असं काय केलंय या चिमुकल्याने? पाहा पुढे...
Don’t mess with this kid… 🤭😂🔊 pic.twitter.com/pQecsMFGah
— Mack & Becky Comedy (@MackBeckyComedy) July 8, 2021
लहान मुलं म्हटली की घर कसं खेळतं राहत. घरात जणू गोकुळच असल्याचा भास होतो. सर्व थोरामोठ्यांना ते मुल लळा लावतं. असाच एक चिमुकला सध्या नेटकऱ्यांना लळा लावतोय. त्याची फ्लाईंग किक सध्या जोरदार व्हायरल होतेय.
हा चिमुकला त्याचा पाय असा काही हवेत फिरवतो की ज्या बाटलीवरून तो पाय फिरवतो त्याचे झाकणही हवेत उडते. त्याचे हे कर्तब पाहुन नेटकरी चांगलेच हैराण झाले आहेत. काहीजण सारखा सारखा तो व्हिडिओ पाहत आहेत त्यावर कमेंट करत आहेत. या मुलाची फ्लाईंग किक अक्षय कुमारसारखी असल्याचंही काहीजण म्हणत आहेत. मॅकबेकी कॉमेडी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.