शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षाच्या लिडियनचा कौतुकास्पद कारनामा, परदेशात मिळवलं ६.९ कोटींचं बक्षिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:33 IST

चेन्नईच्या एका १३ वर्षीय पियानोवादक लिडियन नादस्वरम याने संगीत साधनेच्या माध्यमातून जगभरात आपलं नाव मानाने मोठं केलं आहे.

संगीत शिकणे हे कोणत्याही साधनेपेक्षा कमी नसतं. मोठमोठे या साधनेपुढे फिके पडतात. पण चेन्नईच्या एका १३ वर्षीय पियानोवादक लिडियन नादस्वरम याने संगीत साधनेच्या माध्यमातून जगभरात आपलं नाव मानाने मोठं केलं आहे. गेल्या गुरूवारी लिदियनने अमेरिकन रिअॅलिटी शो 'द वर्ल्ड्स बेस्ट' चा किताब आपल्या नावावर केला. त्याला यासाठी बक्षिस म्हणून १ मिलियन डॉलर म्हणजे ६.९ कोटी रूपये मिळाले. 

लिडियन चेन्नईच्या KM Music Conservatory चा विद्यार्थी आहे. या संस्थेची स्थापना प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनी केली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या शोमध्ये लिडियनने निकोलाई रिमस्की-कोर्साकोवची 'द फ्लाइट ऑफ द बंम्बल्बी'ची ट्यून अशी काही सादर केली की, हॉलमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

लिडियनचे वडील संगीतकार आहेत. आणि त्यांनी मुलासोबत हा पुरस्कार मिळवला आहे. लिडियन ४ वर्षांचा असतानापासून पियानो वादन करतो. तो म्हणाला की, 'मला जगातला सर्वात चांगला पियानो वादक व्हायचं आहे. मला चंद्रावर जायचं आहे आणि बीथोवेन मूनलाइट सोनाटा खेळायचं आहे'. तसेच त्याला भावनिक सिनेमांसाठी संगीत द्यायचं आहे. 

या शोच्या अंतिम सोहळ्यात लिडियनने दोन पियानोवर मेडली ट्यून एकत्र सादर करून ८४ गुण मिळवले. तर ६३ गुण मिळवून दक्षिण कोरियाचा कुक्कीवॉन हा रनर-अप राहिला. लिडियनबाबत ए.आर.रहमान यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे. 

लिडियन हा नुकताच 'द एलेन डीजेनरेस शो' मध्येही दिसला होता. यावेळी त्याने सांगितले होते की, तो दोन पियानोवर वेगवेगळ्या ट्यून वाजवू शकतो. त्याने ते करून दाखवलं आणि सोशल मीडियात त्याची एकच चर्चा रंगली होती. यावेळी त्याने डोळ्यांवर पट्टी बांधून पियानो वाजवला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmusicसंगीतA. R. Rahmanए. आर. रहमान