शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फोटोत आहे हरणांची शिकार करायला दबा धरुन बसलेला चित्ता, तीक्ष्ण नजर असेल तरच सापडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 10:51 IST

शिकारीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात हरणांची शिकार करण्यासाठी एक चित्ता दबा धरून बसला आहे. ज्याला शोधण्याचं चॅलेंज तुमच्यासमोर आहे.

प्राण्यांचे बरेच व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या हल्ल्याचे तर तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. प्रत्येक प्राण्यांची शिकार करण्याची तशी एक वेगळी स्टाईल असते. पण बहुतेक प्राणी समोरच्याला बेसावध ठेवून संधी मिळताच डाव साधतात. ज्याची शिकार होणार आहे, त्यालाही त्याच्यावर येणाऱ्या संकटाची माहिती नसते. अशाच शिकारीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात हरणांची शिकार करण्यासाठी एक चित्ता दबा धरून बसला आहे. ज्याला शोधण्याचं चॅलेंज तुमच्यासमोर आहे.

वाइल्डलाइफ फोटोग्राफर रिचर्ड कॉस्टिनने हा फोटो क्लिक केला आहे. केन्याच्या मसाई मारा जंगलातील हे दृश्य आहे. जिथं आपल्याला फक्त हरणांचा कळप दिसतो. दूरदूरपर्यंत दुसरा कोणताच प्राणी दिसत नाही. फोटोग्राफरच्या मते, हरणांचा कळप तिथं आला. त्यांच्या शारीरिक हालचालीवरून ते घाबरल्याचे दिसत होते. पण त्यांच्या भीतीचं, चिंतेचं कारण समजत नव्हतं. अखेर ते कारण कॅमेऱ्यात कैद झालं.

हरणांची शिकार करण्यासाठी आलेला चित्ता त्यांच्या खूप जवळ आहे. पण त्या हरणांनाही तो दिसला नाही. फोटोग्राफरलाही बऱ्याच मेहनीतनंतर  दबा धरून बसलेल्या या चित्त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करता आलं. आता त्याच चित्त्याला शोधण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर त्यात आपल्यालाही सहजासहजी चित्ता दिसत नाही. चित्ता अशा ठिकाणी आणि अशा पद्धतीने लपला आहे की तो पटकन दिसत नाही. त्यासाठी एखाद्याची नजर गरूडासारखीच असायला हवी.  आता तुमची नजर गरूडासारखी आहे की नाही हे तुम्ही या चित्त्याला शोधून दाखवल्यावरच समजेल. काय मग तुम्ही हे चॅलेंज घ्यायला तयार आहात का? चला तर मग हा फोटो पाहा आणि त्यात चित्त्याला शोधा. तुम्हाला सापडला हा चित्ता. सापडला तर आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

आता तुम्ही जो अंदाज बांधला तो बरोबर होता की नाही हे तुम्हाला कसं समजेल? तर यासाठी ही स्टोरी पुढे वाचा. तुमचा अंदाज योग्य होता की नाही तेसुद्धा तुम्हाला समजेल आणि चित्ता नेमका कुठे लपून बसला आहे तेसुद्धा दिसेल.

उजव्या बाजूला नीट पाहा. गवतांच्या मध्ये एक वेगळीच आकृती दिसेल. ही आकृती म्हणजेच चित्ता आहे. काही क्षणातच हा चित्ता हरणांवर हल्ला करतो आणि हरणं आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया