Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:36 IST2026-04-11T14:32:28+5:302026-04-11T14:36:05+5:30

Shocking: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.

Chasing Likes, Risking Life: Father Forces Toddler to Jump from Balcony for Viral Video | Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक

Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी एका व्यक्तीने पोटच्या मुलाचा जीव धोक्यात घातल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे इंटरनेटवर संतापाची लाट उसळली असून, संबंधित व्यक्तीच्या कृत्यावर कडाडून टीका होत आहेत.

नेमकी घटना काय?

व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, साधारण तीन वर्षांचे एक लहान मूल पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या रेलिंगवर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, बाल्कनीच्या खाली उभा असलेले त्याचे वडील चिमुकल्याला खाली उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. काही क्षणातच चिमुकला खाली उडी मारलो. सुदैवाने, वडिलाने त्याला झेलतो. परंतु, अशा या कृत्यामुळे मुलाला कायमस्वरूपी अपंगत्व किंवा जीवघेणी दुखापत होऊ शकली असती.

नेटकऱ्यांमध्ये संताप

हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संबंधित पालकांवर टीकेचा भडिमार केला. अनेक वापरकर्त्यांनी याला निष्काळजीपणा म्हटले आहे. "एखाद्या रीलसाठी पोटच्या मुलाचा जीव धोक्यात घालणे ही विकृती आहे," अशा शब्दांत नेटीझन्सनी आपला संताप व्यक्त केला आहे.

कारवाई होण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते ,उडी मारताना झालेली एक छोटीशी चूक पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत करू शकते. शिवाय, मुलांना धोक्याची जाणीव होण्याऐवजी, त्यांना धोका हा एक खेळ वाटू लागतो. यामुळे भविष्यात मुले स्वतःहून अशा धोकादायक कृती करण्यास प्रवृत्त होऊ शकतात.  मुलांचे आयुष्य धोक्यात घालणे हे बाल हक्क आणि सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन आहे. बाल संरक्षण सेवा अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून मुलाचा ताबा काढून घेण्यासारखी कठोर पावले उचलू शकते.

Web Title : वायरल वीडियो: लाइक्स के लिए पिता ने बच्चे की जान जोखिम में डाली; आक्रोश।

Web Summary : एक वायरल वीडियो में एक पिता सोशल मीडिया लाइक्स के लिए अपने छोटे बच्चे को बालकनी से कूदने के लिए प्रोत्साहित कर रहा है। इस हरकत से आक्रोश फैल गया है, और नेटिज़न्स ने इस खतरनाक स्टंट और बाल खतरे के लिए संभावित कानूनी नतीजों की निंदा की है।

Web Title : Viral Video: Father risks child's life for likes; outrage erupts.

Web Summary : A viral video shows a father encouraging his young child to jump from a balcony for social media likes. The act sparked outrage, with netizens condemning the dangerous stunt and potential legal repercussions for child endangerment.