भरधाव कारची जोरदार धडक; ट्रॅक्टरचे दोन भाग झाले, पण ड्रायव्हर... पाहा थरारक VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:19 IST2022-05-10T17:16:55+5:302022-05-10T17:19:45+5:30
भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद; अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

भरधाव कारची जोरदार धडक; ट्रॅक्टरचे दोन भाग झाले, पण ड्रायव्हर... पाहा थरारक VIDEO
एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरधाव कार आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. कारचा वेग इतका जबरदस्त होता की ट्रॅक्टरचे थेट दोन भाग झाले. ट्रॅक्टरचा चालक अपघातातून थोडक्यात बचावला. त्याला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. अपघातानंतर कार चालक फरार झाला.
व्हिडीओमध्ये एक ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कच्च्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आणताना दिसत आहे. ट्रॉलीवर बरंचसं सामान असून त्यावर काही जण बसले आहेत. कार रस्त्यावरून वेगानं येत असल्याचं ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात आलं नाही. कारचा चालकदेखील ट्रॅक्टर-ट्रॉली पाहून थांबला नाही. त्यानं कारचा वेगदेखील कमी केला नाही. त्यामुळे दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे दोन भाग झाले.
ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण धडकेनंतरही सुदैवानं ट्रॅक्टर चालक वाचला. ट्रॉलीमध्ये असलेल्या लोकांना इजा झाली नाही. अपघातानंतर कार चालक तिथून पळून गेला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर ११ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.