सिनेमातल्या स्टंट सीनप्रमाणे उडतेय ही गाडी, व्हिडिओ पाहुन तुमचा होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:13 PM2021-07-20T20:13:17+5:302021-07-20T20:13:57+5:30

हवेत उडणारी गाडी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गाडी प्रत्यक्षात हवेत उडतेय. हा रिअल लाईफ व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर शहारे आल्यावाचून राहणार नाहीत.

This car is flying like a stunt scene in a movie, watching the video will make you tremble | सिनेमातल्या स्टंट सीनप्रमाणे उडतेय ही गाडी, व्हिडिओ पाहुन तुमचा होईल थरकाप

सिनेमातल्या स्टंट सीनप्रमाणे उडतेय ही गाडी, व्हिडिओ पाहुन तुमचा होईल थरकाप

Next

हिंदी सिनेमातील रिल लाईफ मधले स्टंट रिअल लाईफमध्ये घडले तर? तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल ना? हवेत उडणारी गाडी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गाडी प्रत्यक्षात हवेत उडतेय. हा रिअल लाईफ व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर शहारे आल्यावाचून राहणार नाहीत.कॅलिफोर्नियातील युबा शहरातील ही घटना आहे. हायवेवरून एक कार जात होती. तितक्यात तिच्यासमोर दुसरी कार वरून उडत आली आणि धाडकन कोसळली. हा व्हिडिओ पाहुन तुमचे हातपाय थरथरायला लागतील. मग विचार करा ज्या गाडीसमोर ती गाडी उडाली त्या गाडीतील ड्रायव्हर आणि प्रवाशांच काय झालं असेल...

या गाडीला वरून उडताना आणि नंतर आदळताना पाहुन व्हिडिओत एका महिलेचा जोरदार आवाज येतो. हि महिला ज्या गाडीसमोर ही कार पडते त्या गाडीतच बसली आहे. त्यांनीच हा व्हिडिओ काढला आहे. ही क्लिप प्रेस लाईफ या व्हिडिओ चॅनलने शेअर केली आहे. या व्हिडिओखाली कॅप्शन लिहिलं आहे की धुराच्या लोटात ही गाडी वरून आली आणि हायवेवर मधोमध आदळली. दरम्यान हा हिट अँड रनचा मामला असून या गडबडीतच हा अपघात झाला आहे.

Web Title: This car is flying like a stunt scene in a movie, watching the video will make you tremble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app