Social Viral: अफलातून डिझाईन! या फ्लॅटमध्ये किचन आहे, पण लोकांना दिसत नाहीए
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 21:56 IST2021-10-21T21:55:08+5:302021-10-21T21:56:13+5:30
Find the kitchen: या सदनिकेचे 7 दिवसांचे भाडे 800 पाऊंड म्हणजेच 82 हजार रुपये आहे. हे घर पूर्णपणे फर्निश्ड असून सुरक्षित आणि स्टायलिश देखील आहे.

Social Viral: अफलातून डिझाईन! या फ्लॅटमध्ये किचन आहे, पण लोकांना दिसत नाहीए
ब्रिटनमध्ये एक फ्लॅट विक्रीसाठी काढण्यात आला आहे. यासाठी त्या फ्लॅटच्या मालकाने फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फ्लॅट ठीकठाक आहे, परंतू त्यात किचनच लोकांना दिसत नाहीए. लोकांना त्यांची नजर धोका देत आहे.
खरेतर हे किचन खूप कौशल्याने लपविण्यात आले आहे. किचनची अशी डिझाईन करण्यात आली आहे, की जेव्हा गरज असेल तेव्हाच ते लोकांना दिसू शकेल. अन्य वेळी ते लोकांच्या नजरेतून सुटेल. हा एक फुल फर्निश्ड फ्लॅट आहे. ब्रिटनच्या लंडनमधील चेल्सीमध्ये किंग्स रोडवर हा फ्लॅट आहे, या सदनिकेचे 7 दिवसांचे भाडे 800 पाऊंड म्हणजेच 82 हजार रुपये आहे. हे घर पूर्णपणे फर्निश्ड असून सुरक्षित आणि स्टायलिश देखील आहे.
या फ्लॅटचे फोटो पाहून असे वाटते की ती एक लायब्ररी आहे. कपाटांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली आहेत. मात्र, जेव्हा तुम्ही बुकशेल्फवर नीट नजर फिरवाल तेव्हा तुमच्या डोळ्यांनी धोखा खाल्ल्याचा अनुभव येईल. कारण ते एक डिझाईन आहे, खरे बुकशेल्फ नाही. त्याच्या मागे किचन लपलेले आहे.
फ्लॅटच्या एका मोठ्या भागात रिसेप्शन एरियामध्येच ओपन किचन आहे. ते आहे पण दिसत नाही. या फ्लॅटमध्ये मॉडर्न बाथरूम आणि बिल्ट इन स्टोरेजदेखील आहे.