तीक्ष्ण नजरेसाठी कुणाचं उदाहरण दिलं जातं तर गरूडाचं आणि चपळपणासाठी दिलं जातं बिबट्याचं. या दोन्ही गोष्टी एखाद्यात असेल तर त्याच्या नजरेतून काही सूटणार नाही. तुम्हालाही असंच वाटत असेल तर चला एक टेस्ट घेऊया. हा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एक कुत्रा लपलेला आहे. जर तुम्ही तो कुत्रा शोधला तर स्वत:ला शाब्बासी द्या. जर नाही दिसला तर डोळ्यांवर काम करण्याची गरज आहे असं समजा.
एका रेडीट यूजरने हा फोटो शेअर केलाय. त्याने कॅप्शनला लिहिले की, 'मी कुत्र्याला १० मिनिटे शोधत राहिलो'. म्हणजे विचार करा की, डॉगीचा मालक त्याला १० मिनिटे शोधू शकला नाही तर आपलं काय होईल.
I was frantically looking for my dog for 10 minutes. from r/aww
अनेकांनी हा फोटो पाहिला. अनेकांना लगेच या फोटोत लपलेला कुत्रा दिसला तर अनेकजण कुत्रा शोधून शोधून थकले. पण त्यांना काही सापडला नाही. खरंतर आता तुम्ही घरातच आहात आणि तुमच्याकडे वेळही आहे. तर यातील कुत्रा शोधल्याने तुमचा वेळही चांगला जाईल आणि तुमच्या डोळ्याची टेस्टही होईल.
आता तुम्हाला या फोटोत लपलेला कुत्रा दिसला तर चांगलीच गोष्ट आहे. पण दिसला नाही तर नाराज होऊ नका. कुत्रा कुठे लपलाय याचाीही फोटो आम्ही खाली देत आहोत. ज्यांना अजिबातच मेहनत करायची नाही. त्यांच्यासाठी हा फोटो.
आता दिसला ना लपलेला कुत्रा?