बोटीनं प्रवास करत होत्या दोघी, अन् देवमाश्यानं अख्खी बोट तोंडात घातली; पाहा थरारक व्हिडीओ
By Manali.bagul | Updated: November 5, 2020 14:46 IST2020-11-05T14:30:23+5:302020-11-05T14:46:52+5:30
Viral News in Marathi : समुद्रातून अचानक एका व्हेल माश्याने मान वर काढत या दोघींच्या बोटीवर हल्ला केला. त्यानंतर जवळपास ही बोट गिळण्याच्या तयारीत व्हेल होता.

बोटीनं प्रवास करत होत्या दोघी, अन् देवमाश्यानं अख्खी बोट तोंडात घातली; पाहा थरारक व्हिडीओ
व्हेल पाहण्यासाठी आणि शांततापूर्ण दिवसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन मुलींना अनपेक्षित, भयंकर प्रसंगाला तोंड द्यावे लागले आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार जूली मॅकसोरले आणि लिज़ कॉट्रियल या दोघी मैत्रिणी कॅलिफोर्नियात व्हेल पाहण्यासाठी गेल्या होत्या. समुद्रात बोटीत बसून व्हेल आणि पक्षी पाहण्याचा आनंद घेत असताना त्यावेळी एक धक्कादायक घटना घडली. समुद्रातून अचानक एका व्हेल माश्याने मान वर काढत या दोघींच्या बोटीवर हल्ला केला. त्यानंतर जवळपास ही बोट गिळण्याच्या तयारीत व्हेल होता.
Lucky to be alive: an Avila Beach woman says she is okay after a whale capsized her kayak (shown here). Hear from her and tips for staying safe out on the water tonight at 10&11. (Video: Kellie Balentine) @KSBYpic.twitter.com/WOy4itCzhW
— Melissa Newman (@melnewmantv) November 3, 2020
जुली आणि लिज एविला बीचवर होत्या. जेव्हा हा प्रसंग घडला त्यावेळी या दोघी किनाऱ्यापासून खूप लांब आल्या होत्या. जूलीने फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले की, '' मोठा व्हेल आमच्या बोटीजवळ येतोय हे समजल्यानंतर मी ओरडायला सुरूवात केली. जेव्हा व्हेल आमच्यापर्यंत पोहोचला तेव्हा काही सेकंदांसाठी हवेत उडून आम्ही पुन्हा पाण्यात आलो.'' लिज म्हणाली की, ''देवमासा जवळ आल्यानंतर मी विचार केला की, देवमाश्याला धक्का मारून दूर करता येईल. तेव्हाच आपला जीव जाऊ शकतो असाही विचार मनात आला. देवमाश्याने हल्ला केला तेव्हा आम्ही पाण्यात आणि व्हेल वर होती. '' शाब्बास! नागपूरच्या २४ वर्षीय पोरानं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'अशी' 2 इन 1 बॅग
ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड करण्यात आली आहे. या व्हेलने दोघींना गिळून टाकलं असतं. पण सुदैवाने या दोघी वाचल्या आणि व्हेल तिथून निघून गेली. हॅम्पबॅक व्हेल क्रिल, प्लँकटन आणि छोट्या माश्यांच्या आहारावर जीवंत असतात. समुद्राच्या किनाऱ्याजवळ येणारे शक्तीशाली व्हेल आहेत. जूली मॅकसर्ले आणि लिज कोट्रिएल यांनी कोणताही जखम झाली नाही. या दोघींना वाचवण्यासाठी अनेक पॅडलबोर्ड पुढे आल्या होत्या. या घटनेदरम्यान जुलीने आपल्या गाडीची चावी हरवली. कुटूंबियांना आणि मित्र मैत्रिणींना सांगण्यासाठी एक नवीन अनुभव मिळाल्याचे त्या दोघी म्हणाल्या. Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल