शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:५६ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर फिरवला बुलडोझर; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 18:43 IST

गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवला आहे.

गांधीनगर

गुजरातच्या सुरत जिल्ह्यात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटल्यांवर बुलडोझर फिरवला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे. पोलिसांनी विविध भागातून अवैध दारूच्या बाटला जमा केल्या होत्या ज्यांना नष्ट करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असून देखील अनेकवेळा दारूची विक्री आणि दारू सापडल्याच्या घटना समोर येत असतात. 

गुजरात पोलिसांनी विविध भागांतून जमा केलेली ५६ लाखांची अवैध दारू अखेर नष्ट करण्यात आली. यासाठी पोलिसांनी दारूच्या सर्व बॉटल्स रस्त्यावर पसरल्या आणि त्यावर बुलडोझर फिरवला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाखो रूपयांच्या दारूवर कसा बुलडोझर फिरवला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही अनोखी कारवाई करताना पोलिसांचा तिथे मोठा बंदोबस्त होता. 

पोलीस उपायुक्तांनी काय म्हटलं? या घटनेची माहिती देताना सुरतमधील पोलिस उपायुक्त यांनी म्हटले, "ही अवैध दारू पोलिसांनी विविध भागातून जमा केली आहे आणि अगदी त्याच पद्धतीने नष्ट केली आहे. याच पद्धतीची कारवाई इथून पुढे देखील होत राहील आणि याच पद्धतीने दारू नष्ट केली जाईल." अस म्हणत उपायुक्तांनी दारू माफियांनी इशारा दिला आहे. 

शौचालयाच्या खड्ड्यात लपवली होती दारू काही आठवड्यांपूर्वी सुरत पोलिसांनी एका अशाच दारू माफियाचा शोध लावला होता, ज्याने आपल्या शौचालयाच्या खड्ड्याला दारूचे दुकान बनवून त्यामध्ये २.८५ लाखांची अवैध दारू लपवून ठेवली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी दारू माफिया काशीनाथला ताब्यात घेतले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाalcohol prohibition actदारुबंदी कायदाGujaratगुजरातPoliceपोलिसTwitterट्विटर