VIDEO: मोबाईलच्या दुकानात शिरला मोकाट बैल, घातला धुमाकूळ; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:58 IST2021-09-27T13:56:08+5:302021-09-27T13:58:02+5:30

मोकाट बैलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

bull reached in mobile shop video viral on social media | VIDEO: मोबाईलच्या दुकानात शिरला मोकाट बैल, घातला धुमाकूळ; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद

VIDEO: मोबाईलच्या दुकानात शिरला मोकाट बैल, घातला धुमाकूळ; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: मोबाईलच्या दुकानात एका बैलानं धुमाकूळ घातला आहे. मोकाट सुटलेला बैल दुकानात शिरल्यानं कर्मचारी धास्तावले. सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. बैलानं दुकानात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यामुळे दुकानाचं मोठं नुकसान झालं. बैलाचा धुडगूस दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाजारातील एका मोबाईलच्या दुकानात मोकाट सुटलेला बैल घुसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. दुकानात शिरताच बैल थेट काऊंटरवर जातो. बैलाच्या धडकेनं काऊंटर उलटतं. काऊंटर वजनदार असल्यानं बैलाला ब्रेक लागतो. मग तो इथे तिथे पाहू लागतो. कर्मचारी दुकानाच्या एका टोकाला जाऊन उभे राहतात. दुकानाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलेला बैल बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागतो.

काऊंटरवर धडकलेला बैल मागे वळून पाहतो. त्याला बाहेर जाण्याचा मार्ग सापडतो. बैल त्या दिशेनं सुसाट सुटतो. कर्मचारी दुसऱ्या बाजूला उडी मारून स्वत:चा जीव वाचवतात. बैल दुकानातून बाहेर जातो आणि सगळे कर्मचारी सुटकेचा निश्वास टाकतात. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बैलानं घातलेल्या धुमाकूळामुळे दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे.

Web Title: bull reached in mobile shop video viral on social media