शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बाबो! शांतपणे आपली ड्युटी करत होता पोलीस, मागुन बैल आला अन् उचलून जमीनीवर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:51 IST

कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे ड्युटीवर असताना शेरपूर चौकात उभे होते, तेव्हा मागून आलेल्या एका बैलाने त्यांना शिंगावर उचललं आणि आपटलं. यामुळं ते बेशुद्ध झाले.

देशाच्या राजधानीतील दयालपूर भागात गुरुवारी संध्याकाळी दिल्लीपोलिसांच्या एका हवालदारावर ड्युटी सुरू असताना एका बैलानं प्राणघातक हल्ला केला. कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे शेरपूर चौकात ड्युटी देत ​​असताना ही घटना घडली. बैलानं या हवालदारावर मागून हल्ला केला आणि त्याला शिंगांच्या सहाय्यानं हवेत फेकलं आणि जमिनीवर आपटलं.

ज्ञानसिंग यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या पाठीच्या हाडाला खूप दुखापत झाली आहे. जमिनीवर पडल्यानंतर या पोलिसाला स्वतःहून उठता येत नव्हतं. ड्युटीवर असलेल्या इतर पोलिसांनी त्याला आधार देत हॉस्पिटलमध्ये नेलं.

कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे ड्युटीवर असताना शेरपूर चौकात उभे होते, तेव्हा मागून आलेल्या एका बैलाने त्यांना शिंगावर उचललं आणि आपटलं. यामुळं ते बेशुद्ध झाले. सुदैवानं ते जमिनीवर पडल्यानंतर बैल निघून गेला आणि त्यानं त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला नाही. झालेला प्रकार बघितल्यानंतर ड्युटीवर असलेल्या इतर पोलिसांना काहीच सुचेना. त्यांनी ज्ञानसिंग यांना घाईघाईनं उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं.

या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ड्युटीवर असलेल्या ज्ञानसिंग यांना बैलानं कसं उचलून आपटलं हे दिसत आहे. ते मोबाईलवर एका वाटसरूचा फोटो काढत असताना ही घटना घडली. सुदैवानं बैलानं त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला नाही. या अचानक झालेल्या हल्ल्यानं ज्ञानसिंग काही क्षणांसाठी स्तब्ध झाले पण त्यांनी संयम राखला. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचार्‍याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि बैलाने पुन्हा हल्ला केला नाही, हे सुदैव असल्याचं लोक म्हणत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdelhiदिल्लीPoliceपोलिस