Video: १ दिवसांत उभी राहिली १० मजली इमारत; ‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीनं चीनची कमाल, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 14:12 IST2021-06-19T14:11:30+5:302021-06-19T14:12:00+5:30
ही एक सोप्पी ऑनसाईट इन्स्टॉलेशन प्रक्रीया होती. केवळ नटबॉल्टनं फिट करून वीज आणि पाणी कनेक्शन द्यायचं होतं.

Video: १ दिवसांत उभी राहिली १० मजली इमारत; ‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीनं चीनची कमाल, व्हिडिओ व्हायरल
एका इमारतीच्या बांधकामासाठी अनेक महिने आणि वर्ष लागतात. परंतु चीनच्या चांग्शा येथे Broad Group नावाच्या कंपनीनं अवघ्या २८ तास ४५ मिनिटांत तब्बल १० मजली इमारत उभी करण्याचा विक्रम केला आहे. सोशल मीडियावर या कंपनीद्वारे बांधण्यात आलेल्या १० मजली इमारतीच्या बांधकामाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत.
या इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले भाग एका फॅक्टरीमध्ये सुरुवातीला बनवण्यात आले त्यानंतर जिथं ही इमारत बांधणार तिथे नेण्यात आले होते. त्यानंतर इमारतीच्य बांधकामाचे सुटे भाग नट बोल्टच्या सहाय्याने एकमेकांशी जोडून भव्य अशी इमारत तयार करण्यात आली. त्यानंतर इमारतीसाठी लागणारं वीज आणि पाणी कनेक्शनही जोडण्यात आलं. कंपनीचं म्हणणं आहे की, ही एक सोप्पी ऑनसाईट इन्स्टॉलेशन प्रक्रीया होती. केवळ नटबॉल्टनं फिट करून वीज आणि पाणी कनेक्शन द्यायचं होतं.
या इमारतीच्या बांधकामासाठी कंपनीने प्री फॅब्रिकेटेड कन्स्ट्रशन सिस्टम तंत्रज्ञानाचा वापर केला होता. याअंतर्गत इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे सेल्फ कंटेन्ड मॉड्यूलर यूनिट्स असेंबल करण्यात आले. जे आधीच फॅक्टरीमध्ये निर्माण करण्यात आले होते. प्री फॅब्रिकेटेड इमारतींना लवकरात लवकर जोडण्याचं डिझाईन तयार केले जाते.
हा व्हिडिओ Broad Group ने यूट्यूबरवर १७ जूनला शेअर केला होता. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ४ मिनिट ५२ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. कर्मचारी फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेल्या प्री फॅब्रिकेटेड डिझाईनला विविध भागात मशीनच्या मदतीनं जोडून १० मजली इमारत बनवण्यात आली आहे.