शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

भर मंडपात वराने केलं असं काही की वधुने लगावली कानशिलात, व्हिडिओ पाहुन बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:50 IST

एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो, ज्याचा लोक भरपूर आनंद घेतात आणि त्याला अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. मुलगा असो की मुलगी, दोघांचीही इच्छा असते की त्यांचं लग्न खूप वेगळ्या आणि खास पद्धतीने व्हावं. जेणेकरून ते सगळ्यांच्या बराच काळ लक्षात राहील. जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी विविध प्लॅन करतात.

कुणी डोंगरावर जाऊन लग्न करतं, तर कुणी मोठं हॉटेल बुक करतं. लग्नसमारंभातील विविध प्रकारचे व्हिडिओ (Viral Wedding Videos) सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, त्यातील काही व्हिडिओ खूप मजेदारही असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

तुम्ही पाहिलं असेल की लग्नांमध्ये वराला अनेकदा त्याच्या मेहुण्या त्रास देत राहातात आणि त्याची मस्करी करत राहतात. कधी मेहुणी नवरदेवाला चिडवते तर कधी मसकरी करते, पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. यामध्ये नवरदेव एका मुलीशी बोलण्यात एवढा व्यस्त होता की तो त्याच्या शेजारी बसलेल्या नवरीलाच विसरून जातो. यादरम्यान नवरीबाई त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र तो स्वतःमध्येच मग्न असतो.

हे पाहून नवरी थोडी रागवते आणि नवरदेवाच्या डोक्यात मारून त्याला आठवण करून देते की इथे मी पण आहे. यानंतर नवरदेवाला आठवतं की आपण नवरीच्या शेजारी बसलो आहोत आणि तो नवरीशेजारी जाऊन बसतो. यानंतर वधूसह सर्वजण जोरजोरात हसू लागतात. हे दृश्य पाहून तुम्हीही खळखळून हसाल.

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर unzip.world नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १९ दशलक्षाहून अधिकांनी पाहिला आहे, तर 8 लाख 69 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या व्हिडिओची तुलना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेशी केली आहे, तर काहींनी याला स्क्रिप्टेड म्हटलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न