शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

लग्नात दारु ढोसून आलेल्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धुतला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 14:08 IST

भर लग्न मंडपात विधी चालू असताना नवरीने नवरदेवाच्या कानशिलात लगावली.

Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो.  आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण कायम लक्षात राहावा याकरिता प्रत्येकाची धडपड सुरु असते. दोन व्यक्ती त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत संपूर्ण आयुष्य सोबत राहण्याची वचने एकमेकांना देतात. याला सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ अपवाद ठरलाय. 

भर लग्न मंडपात विधी चालू असताना नवरीने नवरदेवाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे लग्न समारंभात आलेल्या प्रत्येकाला धक्काच बसला. घडल्या प्रकाराने लग्न मंडपात एकच खळबळ उडाली. ऐन लग्नाच्यावेळी दारु पिऊन आल्याने राग अनावर झालेल्या नवरीने नवरगदेवाला चांगलाच चोप दिल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा मजेशीर व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नवरीचे रागीट रुप पाहून नवरदेव चांगलाच घाबरलेला दिसतोय.  व्हायरल व्हिडीओमध्ये लग्न समारंभाला आलेल्या नातेवाईकांनी मंडप खचाखच भरलेला आहे. सर्व काही सुरळीत पार पडत असताना अचानक नवरदेवाने गळ्यात वरमाला टाकताच दारुचा वास आल्याने नवरी संतापली आणि तिचा पार चढला. गळ्यात वरमाला टाकताच नवरीने त्याच्या कानशिलात सटासट लगावल्या. घडला प्रकार पाहून मंडपात उपस्थित प्रत्येकजण अचंबित झाला आहे. काय बोलावे तेच कोणाला कळत नव्हते. लग्न मंडपात काही काळ स्मशान शांतता पसरली होती.आपल्या लग्नाच्या दारु ढोसून आल्याने नवरी बाईंनी चक्क राडाच केला. गळ्यातील वरमाळेनेच नवरदेवाला मारत नवरी लग्न मंडपातून पळ काढते. 

 हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी  नवरीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. 

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया