शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! भर पावसात धावतोय घोड्यावर, लग्नाची घाईच झालीय याला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:50 IST

एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात नवरदेव अशा स्थितीमध्ये आपली वरात काढतो, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर (Social Media) सतत मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यात नवरदेव अशा स्थितीमध्ये आपली वरात काढतो, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

व्हिडिओमध्ये नवरदेव छत्री घेऊन पावसात घोड्यावर बसून आपल्या नवरीबाईला आणायला निघाला आहे. यासोबत नातेवाईक आणि पाहुणेही नवरदेवाच्या मागे पाण्यात भिजतच निघाले आहेत. व्हिडिओमधील हे दृश्य अतिशय मजेशीर आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये (Funny Video of Groom) दिसतं की मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जिकडे-तिकडे चिखलच दिसतो. मात्र नवरदेव थोडीही वाट पाहायला तयार नाही आणि पावसातच तो आपल्या नवरीला आणायला निघाला.

या संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे, नवरदेव घोड्यावर बसताच वरातीही आपल्या चपला हातात घेऊन छत्री डोक्यावर घेत नवरदेवाच्या मागे चिखलातून चालू लागतात. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, बहुतेक या साहेबांना खूपच कष्टाने लग्नासाठी मुलगी मिळाली आहे. त्यामुळे तो जराही रिस्क घ्यायला तयार नाही.

दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मी दावा करतो की हा नवरदेव पुढे जोरू का गुलाम होणार. तर आणखी एकाने लिहिलं, प्रकरण प्रेमाचं दिसतंय, त्यामुळेच नवरदेव उतावळा झाला आहे. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर memes.bks नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न