शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: वधुची लग्नमंडपात धडकी भरवणारी एंट्री, वऱ्हाड्यांची झाली हवा टाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 16:04 IST

एका नवरीबाईच्या एंट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही ब्राइडल एंट्री (Bridal entry) पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे.

लग्नात (Wedding Video) नवरा-नवरीला पाहण्याची जितकी उत्सुकता असते, तितकीच उत्सुकता असते ती ते कशी एंट्री मारणार. सामान्यपणे नवरदेव घोड्यावर बसून नवरीच्या दारी वरात घेऊन येतो. पण आता नवरीबाईही काही कमी नाही. नवरीबाईसुद्धा जबरदस्त एंट्री मारताना दिसतात. अशाच एका नवरीबाईच्या एंट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही ब्राइडल एंट्री (Bridal entry) पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे.

आपली लग्नातील एंट्री हटके असावी असं स्वप्नं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. कुणी नाचत, कुणी स्कूटीवर, कुणी बाईकवर तर कुणी आणखी कशावर तरी बसून वेडिंग व्हेन्यू म्हणजे लग्नाच्या स्थळी येतात. पण ही नवरी अशा पद्धतीने किंवा अशा मार्गाने विवाहस्थळी आली ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला आकाशात काही फुगे उडताना दिसतात. आकाशात इतके फुगे दिसताच लग्नातील पाहुण्यांचंही लक्ष तिथं जातं. पण हे फक्त फुगे नाही तर या फुग्यांसोबत नवरीही आहे, हे पाहून सर्वजण शॉक होतात. सर्वांना धडकी भरते. पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलेली ही नवरीबाई. डोक्यावर तिने डायमंडचा टियारा धातला आहे. तिच्या आजूबाजूला बरेच फुगे आहेत. फुग्यांना ती लटकलेली आहे आणि याच फुग्याच्या मदतीने ती आकाशातून जमिनीवर येत आहेत (Bridal Entry on Floating Balloons). जणू काही आकाशातून एखादी परीच जमिनीवर येत असावी असं वाटतं आहे (Bride enters the wedding venue floating in Balloons).

सामान्यपणे पाश्चिमात्य देशांमध्ये नवरी आपल्या आईवडिलांसोबत लग्नाच्या स्थळी येते. तिच्यासोबत तिचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रीणही असतात. पण ही नवरीबाई फुग्यांसोबत आली. 250 हिलिअम फुग्यांच्या मदतीने ते आकाशातून नवरी जमिनीवर अवतरली.  हवेत उडणारी नवरी आणि जमिनीवर उभं राहून तिच्याकडे पाहणारे पाहुणे एकमेकांना हँडवेव्ह करताना दिसतात. तिचे फोटो, व्हिडीओही काढताना दिसतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न