ऐन रंगात आला होता नवरा नवरीचा डान्स, पण असे काही घडले की थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 07:39 PM2021-07-22T19:39:08+5:302021-07-22T19:44:11+5:30

लग्नातील जेवण व इतर गोष्टींइतकेच नवरानवरीचा डान्सही पाहण्यासाठी लोक आसूसलेले असतात. नवरा नवरीलाही तो रोमँटिक क्षण पुरेपुर जगावासा वाटतो. पण समजा यात काही चूकीचे घडले तर?

The bride and groom's dance was in full swing, but something happened that took her straight to the hospital ... | ऐन रंगात आला होता नवरा नवरीचा डान्स, पण असे काही घडले की थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली...

ऐन रंगात आला होता नवरा नवरीचा डान्स, पण असे काही घडले की थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली...

Next

लग्नात नवरानवरीचा डान्स म्हणजे प्रमुख आकर्षण, आजकाल आपल्याकडच्या लग्नातही वधुवर डान्स करतात. लग्नातील जेवण व इतर गोष्टींइतकेच तो डान्सही पाहण्यासाठी लोक आसूसलेले असतात. नवरा नवरीलाही तो रोमँटिक क्षण पुरेपुर जगावासा वाटतो. पण समजा यात काही चूकीचे घडले तर?

३ जुलैला जुली बेन आणि पॉल रिचटर यांचे लग्न होते. सर्वजण जुली आणि रिचटरच्या डान्सची वाट पाहत होते. जुली आणि पॉल मंचावर आले आणि वेडिंग डान्स करायला लागले. इतक्यात जुली कोसळली. जुलीला काय झाले म्हणून सर्वजण बघायला धावले तर जुलीचा डान्स दरम्यान पाय फ्रॅक्चर झाला होता. आता लग्नाच्याच दिवशी तेही डान्स करताना असं होणं म्हणजे किती दु:खदायक. 

जुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी निदान करण्यात आले की तिच्या गुडघ्याचे हाड डिसलोकेट झाले आहे. त्यानंतर तिच्यावर उपचारही करण्यात आले. जुली आणि पॉलने डॉक्टरांसोबत तिच्या गुडघ्याचा फोटोही काढला. आता हा फोटो ते लग्नाच्या अल्बममध्ये ठेवणार का?
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The bride and groom's dance was in full swing, but something happened that took her straight to the hospital ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app