शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: एन रंगात आलेला लग्नातील डीजे, नवरा नवरी डान्स करायला सुरुवात करणारच होते की इतक्यात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:05 IST

लग्नात फक्त वऱ्हाडीच फक्त नाचतात असं नाही बरं का, नवरा नवरीही अगदी स्वत:च्याच लग्नात जोरदार डान्स करतात. पण अशावेळी काही दुर्घटना घडली तर? एका लग्नात असंच काहीसं झालं ज्यात नवरा मोठ्या संकटातून वाचला.

लग्न म्हटलं की जश्या रुढी, परंपरा तसंच धमालमस्ती, गाणं, डान्सही आलाच. लग्न नवरा नवरीचं जरी असलं तरी त्यात वऱ्हाडी अन् नातेवाईक यांचाच उत्साह जास्त असतो. आजकाल लग्नात डान्स करण्यासाठी हमखास डीजे लावला जातो. अन् त्यातही त्यावर फक्त वऱ्हाडीच फक्त नाचतात असं नाही बरं का, नवरा नवरीही अगदी स्वत:च्याच लग्नात जोरदार डान्स करतात. पण अशावेळी काही दुर्घटना घडली तर? एका लग्नात असंच काहीसं झालं ज्यात नवरा मोठ्या संकटातून वाचला.

डान्स फ्लोअरवर नवरा नवरी डान्स करण्यासाठी उभे होते. तिथं उपस्थित सर्व लोक त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. काही लोक त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते. इतक्यात असं काही झालं की सर्वांचा काळजाचा ठोकाच चुकतो. नवरा-नवरी डान्स करायला सुरुवात करणारच की त्यांच्यावर धाडकन डीजेचा स्पीकर कोसळतो.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी सुरुवातीला फोटो काढताना दिसतात. आता ते डान्स करणार तोच त्यांच्या मागे असलेला डीजेचा स्पीकरण पडतो तो थेट नवरदेवाच्या डोक्यावर. स्पीकरच्या धडकेने नवरदेव समोर ढकलला जातो तर नवरीबाई आपला जीव वाचवण्यासाठी उजव्या बाजूला पळते. तिथं उपस्थित इतर लोकही शॉक होतात.

नवरदेव आपलं डोकं चोळताना दिसतो. त्याच्या डोक्याला आणि पाठीला कदाचित मार लागला असावा पण मोठी दुखापत झाली नाही. @be_harami इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहताच सुरुवातीला आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. पण दुसऱ्याच क्षणी आपल्याला हसूही आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून त्यावर मजेशीर कमेंटही येत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नInstagramइन्स्टाग्राम