शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वरमाला घालयला गेली नवरी अन् नवरदेवानं काढली खोड, नवरीने एकच केला एकच इशारा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:03 IST

एकमेकांच्या गळात वरमाला टाकताना नव्या जोडीमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीची चांगलीच खोड काढली आहे.

लग्नात नवरी आणि नवरदेव यांनी केलेली धम्माल तर पाहण्यासारखी असते. वरमाला घालताना तर काहीवेळा नवरीला उचलूनही घेतले जाते. मग नवरदेवाची जी काही तारांबळ उडते ती बघण्यासारखी असते. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र इथे नवरीला ना उचलून घेतले ना नवरदेवाची तारांबळ उडाली. इथे तर एकमेकांच्या गळात वरमाला टाकताना नव्या जोडीमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीची चांगलीच खोड काढली आहे. व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी उभे राहिले आहेत. नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी आपले हात वर केले आहेत. पण त्याच वेळी नवरदेवाने गंमतच केली. त्यानेही आपले वरमाला धरलेले हात वर करत नवरीला त्याच्या गळ्यात वरमाला टाकण्यापासून अडवले आहे. नवरदेव माझी खोड काढतोय असे समजल्यावर नवरीने त्याला एक इशारा केलाय. तू हात खाली कर. आधी मी वरमाला टाकणार. नंतर तू माझ्या गळ्यात वरमाला टाक, असं ती नवरदेवाला इशाऱ्याने सांगतेय. 

मात्र, एवढं सारं करुनही नवरदेव नवरीचे ऐकत नाहीये. नवरी गळ्यात वरमाला टाकताना नवरदेव पुन्हा पुन्हा आपले वरमाला धरलेले हात वर करत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर Official Niranjanm87 अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न