शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: नवरीने लग्नमंडपात घेतली अशी एंट्री की नवरदेवासह सर्वांनाच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:37 IST

लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Video) होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ (Bride Entry Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्या लग्नाबद्दल प्रत्येक कपलने वेगवेगळी स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या ड्रेस आणि ज्वेलरीपासून व्हेन्यू डेकोरेशनपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे ते विशेष लक्ष देतात. नवरीच्या एन्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपली एन्ट्री (Bride Entry) अतिशय खास असावी अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते.

अनेकदा नवरीची धमाकेदार एन्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तर अनेकदा नवरदेव आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजाने सर्वांचं मन जिंकतो. लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Video) होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ (Bride Entry Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आधी नवरीबाई ओढणीने आपला चेहरा झाकत मंडपात नवरदेवाजवळ यायची. मात्र आता सगळंच बदललं आहे आणि नवरीबाई आता लाजत नाही तर नाचच-गात लग्नात एन्ट्री करते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक नवरी रथावर बसून आपल्या नवरदेवाकडे येत असल्याचं पाहायला मिळतं. नवरीबाईचा हा आगळावेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरीबाई अतिशय सुंदर तयार झाली आहे आणि लव्ह आज कल या फिल्ममधील ‘ला ला ला ला हो गई रे’ गाण्यावर बसल्या बसल्या इन्जॉय करत आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यही तिच्याजवळच डान्स करत आहेत. नवरी आपल्या आयुष्यातील या खास दिवसासाठी अतिशय उत्साही आणि आनंदी असल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर weddings fever नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. एका यूजरने म्हटलं की नवरीची अशी एन्ट्री पहिल्यांदाच पाहिली. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, आजपर्यंत अशाप्रकारे रथावर फक्त नवरदेवालाच एन्ट्री करताना पाहिलं होतं आणि आज नवरीलाही पाहिलं. व्हायरल होणारा हा व्हिडिओ काहीच सेकंदाचा आहे. मात्र नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत असून व्हिडिओ शेअरही करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न