Video : खोल पाण्यात उतरून गर्लफ्रेन्डला करत होता प्रपोज, नाका-तोंडात पाणी जाऊन 'त्याचा' मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:42 IST2019-09-21T13:37:31+5:302019-09-21T13:42:28+5:30

अमेरिकेतील लुइसियानाच्या एका व्यक्तीला गर्लफ्रेन्डला पाण्यातून प्रपोज करणं चांगलंच महागात पडलं आहे. असं करत असताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय.

Boyfriend drowned during proposal to girlfriend under water in Tanzania | Video : खोल पाण्यात उतरून गर्लफ्रेन्डला करत होता प्रपोज, नाका-तोंडात पाणी जाऊन 'त्याचा' मृत्यू...

Video : खोल पाण्यात उतरून गर्लफ्रेन्डला करत होता प्रपोज, नाका-तोंडात पाणी जाऊन 'त्याचा' मृत्यू...

अमेरिकेतील लुइसियानाच्या एका व्यक्तीला गर्लफ्रेन्डला पाण्यातून प्रपोज करणं चांगलंच महागात पडलं आहे. असं करत असताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय. स्टीवन वीबर त्याची गर्लफ्रेन्ड एन्टोइनोसोबत तंजानियाला सुट्टी घालवायला गेला होता. या धक्कादायक घटनेबाबत एन्टोइनेने फेसबुकवर पोस्ट लिहून माहिती दिली.

एन्टोइनेने तिच्या बॉयफ्रेन्डला श्रद्धांजली देत लिहिले की, 'स्टीवन वीबरसारख्या व्यक्तीला श्रद्धांजली देण्यासाठी शब्द नाहीत. तुझ्याशी जे भेटले, त्याच्या जीवनात आनंद भरण्याचं काम तू केलं होतं'. फार भावूक या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'तू त्या खोलातून परत येऊ शकत नाही आणि हे ऐकू शकला नाही, हो! हो! मी तुझ्याशी लग्न करणार'.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात वीबर खोल पाण्यात दिसतो आहे. त्याच्या हातात एक झिपलॉक बॅग आहे. ज्यात एक लेटर आहे. त्यावर लग्नासाठीचं प्रपोज लिहिलं होतं. इतकेच नाही तर तो या व्हिडीओत हे म्हणताना दिसतोय की, 'माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी. मी जास्त वेळ श्वास रोखू शकत नाही. माझं तुझ्यावरील प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं'. 

दरम्यान तो बॉक्समधून रिंग काढतानाही दिसतो आहे. पण पाण्यात तो जास्त वेळ श्वास रोखू शकला नाही. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. एन्टोइनेची फेसबुक पोस्ट सध्या अमेरिकेत चर्चेचा विषय ठरत आहे. हजारो लोकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Boyfriend drowned during proposal to girlfriend under water in Tanzania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.