Boy vents anger at driver after car sends his mother flying watch viral video | वाह रे पठ्ठ्या! कारने आईला धडक मारल्याने लहान मुलगा संतापला, ड्रायव्हरला 'असा' शिकवला धडा!
वाह रे पठ्ठ्या! कारने आईला धडक मारल्याने लहान मुलगा संतापला, ड्रायव्हरला 'असा' शिकवला धडा!

चीनमधील एक लहान मुलगा सध्या सोशल मीडियात हिरो ठरला आहे. लोक त्याच्या बहादूरीचं कौतुक करत आहेत. 'एससीएमपी न्यूज'नुसार, साउथवेस्टर्न चीनच्या चोंगकिंगमध्ये एका महिला तिच्या लहान मुलासोबत रस्ता क्रॉस करत होती. दरम्यान एका कारने त्यांना टक्कर दिली. आई आणि मुलगा दोघेही रस्त्यावर पडले. अशात हा लहान मुलगा रडत रडत उठतो आणि आईला उचलण्याचा प्रयत्न करतोय. इतक्यात तो रडत रडतच कारकडे जातो आणि कारला लाथा मारू लागतो. ड्रायव्हर नंतर दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. 

'एससीएमपी न्यूज'च्या ट्विटरवर हा व्हिडीओ ११ डिसेंबरला शेअर करण्यात आलाय. त्यांनी कॅप्शन दिलंय की, 'हा लहान मुलगा त्याच्या आईचा मोठा हिरो आहे'. आतापर्यंत हा व्हिडीओ ६६ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय. तर ३ हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आई आणि बाळाला फार जास्त जखम नाही. तर पोलिसांनी सांगितले की, या अपघातासाठी पूर्णपणे चालकच जबाबदार आहे. त्याला ताब्यात घेतले आहे.


Web Title: Boy vents anger at driver after car sends his mother flying watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.