शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 16:30 IST

Trending Viral News in Marathi : एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला.

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने कहर केलेला दिसून येत आहे. परभणीनंतर आज मुळशी (Mulshi) तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला असून  परिसरात खळबळ उडाली आहे. एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना एका चिमुरड्याला अश्रू अनावर झाले. 'नाही नाही....' असं म्हणत हा चिमुरडा कोंबड्यांसाठी रडत होता. कारण  घरातील पाळीव प्राण्यांशी लहान मुलांचे एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. अचानक कोणीही येऊन जेव्हा आपल्या घरातील प्राण्यांना घेऊन जातं. अशावेळी मनाला प्रचंड वेदना होतात.

 

नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज ४ ते ५ कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली.  त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. पण तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत

शुक्रवारी उशिरा त्याचा अहवाल आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूच्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले.  प्रशासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देऊन जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नांदे येथील शिंदेवस्त  येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारांवरून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.आता गायीच्या शेणापासून घर रंगवा; 'गोबर पेंटचे' गडकरींनी सांगितले ८ फायदे

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPuneपुणेBird Fluबर्ड फ्लू