शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बॉसला चकवून खेळत होता गेम, बॉसने 'ही' ट्रीक वापरुन केला त्याचाच गेम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:41 IST

बऱ्याचदा जेव्हा काहीजण ऑफिसमध्ये कामाच्या वेळात टाईमपास करण्यासाठी एखादे गाणं ऐकतात किंवा गेम खेळतात. आपल्याकडे कुणीही बघत नाही, असं समजून त्यांचा हा टाईमपास सुरु असतो. पण दरवेळी असंच घडतं असं नाही...

बऱ्याचदा जेव्हा काहीजण ऑफिसमध्ये कामाच्या वेळात टाईमपास करण्यासाठी एखादे गाणं ऐकतात किंवा गेम खेळतात. आपल्याकडे कुणीही बघत नाही, असं समजून त्यांचा हा टाईमपास सुरु असतो. पण दरवेळी असंच घडतं असं नाही, कारण, बॉसची नजर सर्वांकडे असते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या बॉसची किंवा अशाच एखाद्या किश्श्याची आठवण येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की कर्मचारी त्याच्या ऑफिसच्या वेळेत कॉम्युटरवर गेम खेळत आहे, जेव्हा त्याचा बॉस तिथून जात असतो, तेव्हा तो लगेच गेम बंद करतो आणि काम सुरु करतो. त्याला वाटतं बॉसला उल्लू बनवलं, बॉस पुढं निघून जातो. कर्मचाऱ्याला वाटतं, बॉस पुढं निघून गेला. पण यात बॉस भलताच शहाणा निघतो, बॉस पुढे जाऊन खिशातून आपला मोबाईल काढतो, आणि सेल्फी कॅमरा ऑन करतो. जसा बॉस सेल्फी कॅमेरा ऑन करतो, त्यात हा कर्मचारी गेम खेळत असल्याचं स्पष्ट दिसतं आणि हा कर्मचारी रंगेहात पकडला जातो.

हा मजेदार व्हिडिओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे. याव कमेंट करताना एका युजरने म्हटले, ‘बॉस डाल-डाल तर एम्प्लॉयी पात पात.’ तर दुसऱ्या युजरेने लिहिले, ‘बॉस इथून निघून गेला पण निश्चितच त्याचा बदला पुढं तो घेणार आहे. या व्यतिरिक्त, इतर अनेक युजर्सनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकEmployeeकर्मचारी