VIDEO: सोशल मीडियावर व्हायरल झाला निळ्या रंगाचा व्हिडीओ, कॅमेरा बघून दिली अशी खुन्नस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:01 IST2022-01-04T17:54:40+5:302022-01-04T18:01:18+5:30
Blue Snake Viral Video : असंही होऊ शकतं की, अनेकांनी पहिल्यांदाच निळ्या रंगाचा साप पाहिला असेल. आता हा निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO: सोशल मीडियावर व्हायरल झाला निळ्या रंगाचा व्हिडीओ, कॅमेरा बघून दिली अशी खुन्नस...
Blue Snake Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात ज्यांवर सहजासहजी विश्वास बसत नाही. असाच एक सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो बघून लोक अवाक् झाले आहेत. कारण हा साप कोणता साधारण साप नाही तर एक निळ्या रंगाचा (Blue Snake) साप आहे. असंही होऊ शकतं की, अनेकांनी पहिल्यांदाच निळ्या रंगाचा साप पाहिला असेल. आता हा निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. अनेकजण तर दूरूनच साप बघतात. पण जसा साप जवळ येतो तसे लोक पळून जातात. इतकंच नाही तर सापांच्या अनेक प्रजाती असतात. ज्यांना बघून कन्फ्यूजन होतं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका व्यक्तीने हा निळ्या रंगाचा सुंदर साप हातावर ठेवला आहे. त्याच्या हातात दोन साप आहेत. एक छोटा आणि एक मोठा आहे. कॅमेरा बघताच साप हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो.
Blue snake. pic.twitter.com/3HgMcS0GfP
— Jamie Gnuman197... (@JGnuman197) January 2, 2022
असं सांगितलं जात आहे की, साप दिसायला जेवढा सुंदर आहे, तेवढाच तो खतरनाक आहे. अनेकांना हा व्हिडीओ बघून मजा येत आहे तर अनेकजण हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'याआधी त्याने कधीही निळ्या रंगाचा साप पाहिला नाही. फक्त त्याच्याबाबत ऐकलं होतं'.