जीपमधल्या प्रवाश्यांच्या पापण्या मिटताच भरभर झाडावर चढला रुबाबदार ब्लॅक पँथर; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:39 PM2021-03-08T19:39:59+5:302021-03-08T19:44:14+5:30

Trending Viral News : काही सेंकंदात ब्लॅक पँथर  (Leopard Climbs Tree)  झाडावर चढला आहे. जीपमध्ये बसलेले लोक हे दृश्य पाहून चकीत झाले आहेत. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. 

Black panther climbs tree jungle safari tourist gives shocking reaction see viral video | जीपमधल्या प्रवाश्यांच्या पापण्या मिटताच भरभर झाडावर चढला रुबाबदार ब्लॅक पँथर; पाहा व्हायरल व्हिडीओ

जीपमधल्या प्रवाश्यांच्या पापण्या मिटताच भरभर झाडावर चढला रुबाबदार ब्लॅक पँथर; पाहा व्हायरल व्हिडीओ

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.  आतापर्यंत तुम्ही माकडाला, वाघाला झाडावर वेगानं चढताना पाहिलं असेल पण तुम्ही कधी ब्लॅक पँथरला झाडावर चढताना पाहिलं का? इंटरनेटवर सध्या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही सेंकंदात ब्लॅक पँथर  (Leopard Climbs Tree)  झाडावर चढला आहे. जीपमध्ये बसलेले लोक हे दृश्य पाहून चकीत झाले आहेत. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. 

ब्लॅक पँथर जंगलात फिरत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहता येईल. त्याच वेळी लोक सफारी जीपमध्ये बसून ते पहात आहेत. पँथर रस्ता ओलांडून झाडाजवळ उभा होता नंतर तो पटकन झाडावर चढतो आणि धावत असताना उभा राहतो. हे पाहिल्यावर तेथील लोक आश्चर्यचकित झाले आहेत."आसान होता तो हर कोई किसान होता," महिंद्रांच्या जाहिरातीची देशभर चर्चा, पाहा व्हिडीओ

सुशांत नंदा यांनी 7 मार्चच्या रात्री हा व्हिडिओ सामायिक केला होता, ज्यास आतापर्यंत 36 हजारांहून अधिक व्हिव्हज मिळाली आहेत. तसेच 5000 हून अधिक लाईक्स आणि 800 हून अधिक री-ट्वीट मिळाले आहेत. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षावही केला आहे. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

Web Title: Black panther climbs tree jungle safari tourist gives shocking reaction see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.