शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आपल्या बांधवाला निरोप देताना पक्ष्याने जे केलं ते पाहुन तुम्हाला अश्रु होतील अनावर, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:39 IST

आपल्या साथीदाराला गमावणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. साथीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्याजवळ बसून रडणाऱ्या या पक्ष्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत.

माणूस जसा बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो तसं प्राणी करू शकत नाहीत. कारण त्यांना बोलताच येत नाही. शब्दांची भाषा न येणारे हे मुके जीव प्रेम, निष्ठा आणि संवेदनशीलता याबाबत मात्र माणसापेक्षा दोन पावलं पुढंच असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच एका मुक्या जीवाच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या प्रिय साथीदाराला गमावण्याचं दुःख होतंच. अशाच आपल्या साथीदाराला गमावणाऱ्या एका पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. साथीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्याजवळ बसून रडणाऱ्या या पक्ष्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. हा व्हिडीओ जुना आहे. पण तो आता पुन्हा व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर हे दोन पक्षी आहेत. त्यातील एक मृत आहे. जिवंत पक्षी आपल्या या जमिनीवर पडलेल्या साथीदाराकडे जातो.   त्याला आपल्या चोचीने उठवण्याचा प्रयत्न करतो. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने, तो त्याला हलवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. अनेक प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा तो  उठत नाही, तेव्हा त्याची खात्री पटते की तो जिवंत नाही. त्याचा जोडीदार या जगात नाही यावर त्याचा जणू विश्वासच बसत नाही आहे, असं त्याची ती कृती बघून वाटतं.

नंतर अनेक पक्षी तिथं जमलेले दिसतात. आपल्या मित्राला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले दिसत असून, जणू माणसांप्रमाणे तेही शोकसभा घेत आहेत, असं हे दृश्य बघून वाटतं.   या पक्ष्यांचं आपापसातलं प्रेम, विरहानं व्याकुळ झालेल्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप मन हेलावून टाकतं.

हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी गेल्या वर्षी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, जोडीदाराच्या मृत्यूनं दु: खी झालेला हा पक्षी आहे. आपल्या मित्राला, सहकाऱ्याला शेवटचा निरोप देण्याची त्यांची ही तगमग अनेकांना हेलावून टाकणारी आहे. सुशांत यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा ऑस्ट्रेलियन गालाह (Australian Galah) नावाचा पक्षी आहे. पिंक आणि ग्रे कॉकॅटोदेखील (Cokatoo) म्हटले जाते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर