शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी करत होता स्टंट, तेवढ्यात बाईकच उलटली अन् पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 19:10 IST

अनेकजण फेमस होण्याच्या नादत जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवर धोकादायक स्टंट करत आहे. पण, पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडले की, की तो मरता मरता वाचला.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. अनेकजण फेमस होण्याच्या नादत जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवर धोकादायक स्टंट करत आहे. पण, पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडले की, की तो मरता मरता वाचला.

आपल्याला हे जीवन मोठ्या कष्टाने मिळाले आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं ते पुरेपुर आणि आनंदाने जगलं पाहिजे. पण, अनेकजण त्याची पर्वा करत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. एक व्यक्ती त्याच्या जीवाशी कसा खेळ करत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘कोसास दे ला विडा’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला दहा हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा स्कूटीने स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी त्याने आधी स्कूटीचा पुढचा भाग उचलण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच ब्रेक लावून स्टंट करण्याचा प्रयत्न केला, पण याच गोंधळात तो मुलगा सरळ बाईकच्या पुढे आपटला. मात्र, सुदैवाने पलीकडून येणारी वाहनं त्याच्या अंगावरुन गेली नाही. नाहीतर त्याला जीव गमवावा लागला असता.

लोक ही व्हिडीओ क्लिप फक्त शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. लोक स्कूटी चालकाला सूचना देऊ लागले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘याला म्हणतात, जोशात भान हरपणे’. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे’. अजून एकाने लिहले, ‘हे लोक असंकाही करण्यापूर्वी पालकांचा विचार कसा करत नाहीत’. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. आता हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर दिसत आहे

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरbikeबाईक