नाद खुळा! पेट्रोलशिवाय लाकडाच्या मदतीनं पळवली बाईक; तरुणाचा प्रयोग पाहून सारेच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:43 AM2022-01-22T11:43:49+5:302022-01-22T11:44:04+5:30

तरुणाच्या भन्नाट प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; आतापर्यंत २१ लाख लोकांनी पाहिला

bike started with wood without petrol watch this full video | नाद खुळा! पेट्रोलशिवाय लाकडाच्या मदतीनं पळवली बाईक; तरुणाचा प्रयोग पाहून सारेच अवाक्

नाद खुळा! पेट्रोलशिवाय लाकडाच्या मदतीनं पळवली बाईक; तरुणाचा प्रयोग पाहून सारेच अवाक्

googlenewsNext

भारतीय व्यक्ती जुगाड करण्यात पटाईत असतात. अशा जुगाडू व्यक्तींनी केलेल्या विविध प्रयोगांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक जण अशा जुगाडूंचं कौतुक करतात. आनंद महिंद्रा यांच्यासारखे उद्योगपती त्यांच्या कामाची दखल घेतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुगाडू व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानं चक्क लाकडाच्या मदतीनं बाईक चालवली आहे. 

सध्या पेट्रोल महागलं आहे. त्यामुळे काहीजण ई बाईककडे वळले आहेत. मात्र एका तरुणानं चक्क लाकडाच्या मदतीनं बाईक पळवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक यूट्यूबवर मोठ्या मैदानात उभा असल्याचं दिसतं. आज मी पेट्रोलच्या मदतीनं नव्हे, तर लाकडाच्या मदतीनं बाईक चालवून दाखवेन, अशी घोषणा त्यानं सुरुवातीलाच केली आहे. त्यानंतर तो तयारीला लागतो. 

लाकूड एका बॉक्समध्ये भरून त्यातून तरुण गॅससारखा पदार्थ तयार करतो. त्यासाठी तो लाकूड बराच वेळ बॉक्समध्ये ठेवतो. त्यातून तयार झालेला गॅस एका ट्युबमध्ये गोळा करतो. याच गॅसच्या मदतीनं तरुण बाईक चालवतो. तरुणानं केलेला प्रयोग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २१ लाख लोकांनी पाहिला आहे.

Web Title: bike started with wood without petrol watch this full video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.