अवघ्या ५ सेकंदानं वाचला युवकांचा जीव; Live Video नं सोशल मीडियात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:07 IST2022-12-22T12:07:39+5:302022-12-22T12:07:57+5:30
सगळे दृश्य रस्त्यावरील एका कारमध्ये बसलेल्या प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अवघ्या ५ सेकंदानं वाचला युवकांचा जीव; Live Video नं सोशल मीडियात उडाली खळबळ
पीलीभीत - रस्त्याने जाताना अचानक तुमच्यासमोर वाघ उभा राहिला तर काय अवस्था होईल याचा विचार करूनही अंगाचा थरकाप उडेल. उत्तर प्रदेशातील पीलीभीत इथं दुचाकीस्वाराला याच परिस्थितीला सामोर जावं लागलं. दुचाकीस्वाराचं नशीब बलवत्तर म्हणून वाघाच्या हल्ल्यातून २ युवक बचावले. जंगलातून जाणाऱ्या दुचाकीचा वेग युवकांच्या जीवावर बेतला.
विशेष म्हणजे वाघाने कुठलीही घाई केली नाही. चुकून हे युवक जंगलात पोहचल्याचा अंदाज बहुदा त्याला आला असावा त्यामुळे वाघ आक्रमक झाला नाही. जर बाईक ५ सेकंद लेट झाली असती तर युवकाचे शिर वाघाच्या जबड्यात असते. दुचाकीस्वाराने कसंतरी बाईक मागे घेतली. वाघानेही केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर रस्ता क्रॉस करून जंगलात गेला. हे सगळे दृश्य रस्त्यावरील एका कारमध्ये बसलेल्या प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पीलीभीत व्याघ्र प्रकल्पातील जंगलातून अनेक रस्ते जातात. जंगलात वाहनांचा वेग कमी असावा जेणेकरून वन्यजीवांना रस्ता पार करताना कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा सूचना सगळीकडे दिलेल्या असतात. मिळालेल्या माहितीनुसार एक वाघ रस्त्यावरून जात होता तेव्हा कार थांबवून वाहनचालक त्याचा व्हिडिओ बनवत होता. तेवढ्यात मागून वेगाने दुचाकीस्वार आला. दोघं युवक वाघाच्या नजीक पोहचले. नशिबाने वाघ आक्रमक न होता त्याच्या मार्गाने पुढे जात होता.
लाईव्ह फुटेज सोशल मीडियावर व्हायरल
मृत्यूच्या जाचातून थोडक्यात बचावलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघाला समोर पाहताच दुचाकीस्वार हादरले. त्यांनी तातडीनं ब्रेक लावत पायाने बाईक मागे घेतली. वाघानेही आक्रमक न होता त्याच्या मार्गाने पुढे येत राहिला. त्यानंतर हळूच वाघ जंगलाच्या दिशेने गेला. वाघ कधीही कुणावर हल्ला करत नाही. धोका ओळखून वाघ हल्लेखोर होतो.