शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

या माणसाने तोंडातून बाहेर काढला भयानक कोळी, व्हिडिओ पाहुन नेटिझन्सचा उडाला थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 18:21 IST

एक व्यक्ती एका भल्यामोठ्या कोळीसोबत खेळताना दिसतो. मात्र, त्यापेक्षाही हैराण करणारी बाब म्हणजे हा कोळी त्याच्या तोंडातून बाहेर येतो.

जगात अनेक लोक असे असतात ज्यांना किड्यांची प्रचंड भीती वाटते. कोळीलादेखील अनेकजण घाबरतात. मात्र, अनेक लोक असाही दावा करतात की त्यांनी कोळी आवडतो. स्पायडर मॅन चित्रपट पाहून त्यांचं कोळीवरील प्रेम वाढलेलं आहे. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे (Shocking Video of Spider), जो पाहून कोळी आवडणाऱ्या लोकांनाही भीती वाटेल. यात एक व्यक्ती एका भल्यामोठ्या कोळीसोबत खेळताना दिसतो. मात्र, त्यापेक्षाही हैराण करणारी बाब म्हणजे हा कोळी त्याच्या तोंडातून बाहेर येतो.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेचे झू किपर जे ब्रीवर यांचा आहे. ते ‘द रेप्टाइल जू’ (The Reptile Zoo) चे मालक आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यांना ५० लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. जे आपल्या अकाऊंटवरुन प्राण्यांसोबतच इतरही व्हिडिओ शेअर करत राहतात. या व्हिडिओंमधून त्यांचं प्राण्यांबद्दलचं प्रेम दिसतं. कधी विषारी सापांसोबतचे. कधी भयानक मगरीसोबतचे तर कधी मोठमोठ्या पालींसोबतचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. मात्र,सध्या त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये ते एका मोठ्या टॅरंट्यूला कोळीसोबत दिसत आहेत.

हॅलोवीनच्या निमित्ताने त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसतं की त्यांच्या तोंडात एक कोळी असतो आणि तोंड उघडताच हा कोळी बाहेर येतो. व्हिडिओ इतका भयंकर आहे, की पाहूनच लोक घाबरत आहेत. जे यांचे हावभाव पाहून असं जराही वाटत नाही, की त्यांना या कोळीची भीती वाटत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हॅलोवीन आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील गोष्टीही भीतीदायक होत आहेत. विदेशांमध्ये हॅलोवीन आज म्हणजेच ३१ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. यादिवशी लोक अतिशय भीतीदायक मेकअप करून लोकांसमोर जातात. आपल्या पूर्वजांच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम