Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:10 IST2025-10-27T15:09:13+5:302025-10-27T15:10:53+5:30
Viral Video: दोन तरुणांनी चपाती फुगवण्यासाठी वापरलेली आयडिया पाहून महिला देखील चकीत झाल्या आहेत.

Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात. अशाच एका विचित्र व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोन तरुणांनी चपाती फुगवण्यासाठी वापरलेली आयडिया पाहून महिला देखील चकीत झाल्या आहेत. नेटकऱ्यांच्या मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
ये टेक्नोलॉजी इंडिया से बाहर नहीं जाना चाहिए..!😂
— 𝐌𝐫 𝐀𝐫𝐛𝐚𝐳❤️🔥 (@Mr_arbaz_77) October 26, 2025
रोटी फुलाने का ये तरीका कैसा लगा आपको...?👇 pic.twitter.com/pYnwjgi5tn
व्हिडिओमध्ये दोन तरुण मातीच्या चुलीजवळ बसलेली दिसत आहेत. एक मुलगा चपात्या भाजत आहे, पण त्या फुगत नसल्यामुळे तो निराश होतो. त्यानंतर चपाती फुगवण्यासाठी त्यांना एक कल्पना सुचते. दोघे एक सायकलचा टायर एअर पंप घेऊन येतात आणि चपातीमध्ये टाकून पंप मारायला सुरुवात करतात. हवा आत गेल्याने चपाती फुगते. पण थोड्यावेळाने पुन्हा ती आपल्या आधीच्या आकारात येते. तरुणांचा हा निरागस प्रयत्नाचे सोशल मीडियावर कौतुक करीत आहेत.
@Mr_arbaz_77 नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "हे टेक्नोलॉजी भारताबाहेर गेली नाही पाहिजे! तुम्हाला चपात्या फुगवण्याची ही पद्धत कशी वाटली?" या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, "आता कोणीही असे म्हणू शकत नाही की, मुले चपाती फुगवू शकत नाही. आता, एक नवीन स्वदेशी उपाय समोर आला आहे." दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, "ही टेक्नोलॉजी बाहेर काम करणाऱ्या अविवाहितांसाठी उपयुक्त ठरेल." तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, "चपाती फुगवण्यासाठी ही एक अद्भुत टेक्नोलॉजी आहे." चौथ्या वापरकर्त्याने सांगितले की, "मी देखील या टेक्नोलॉजीचा वापर करणार आहे."